वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेते अशोक तंवर यांना मूळ काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. त्याच वेळी त्यांनी दिल्लीतले काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनाही आपल्या पक्षात सामावून घेतले. या पक्ष प्रवेशाच्या वेळी ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अशोक तंवर यांनी मला निमंत्रण दिले की मी हरियाणाचा दौरा करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.Rahulji’s close aide Ashok Tanwar in Trinamool Congress
याचा अर्थ ममता बॅनर्जी यांचा पुढचा राजकीय पाडाव हरियाणा असणार आहे. आत्तापर्यंत ममता बॅनर्जी यांनी आसाम, त्रिपुरा, मणिपूर, गोवा आणि दिल्ली या राज्यांतील दौरे केले आहेत. यापुढचा त्यांचा दौरा हरियाणाचा असेल. अशोक तंवर यांनी ताबडतोब त्यांना हरियाणा दौऱ्याचे निमंत्रण दिले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या आहेत की ज्या भाजपला 2024 च्या निवडणुकीत पराभूत करू शकतात. पश्चिम बंगाल मध्ये त्यांनी भाजपचा पराभव केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकत्र आले तर देशभरात भाजपचा पराभव करणे अवघड नाही, असे वक्तव्य अशोक तंवर यांनी केले आहे.
किर्ती आझाद यांनी देखील ममता बॅनर्जी यांची स्तुती करत त्या सध्याच्या पंतप्रधानांना यशस्वी टक्कर देऊ शकतात, असा दावा केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या दुसऱ्या दिल्ली दौऱ्याची ही सुरुवात आहे. उद्या त्यांचे राजधानीत विविध कार्यक्रम असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत.
Rahulji’s close aide Ashok Tanwar in Trinamool Congress
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह प्रकरणात वकिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार, म्हणाले- तपासात निष्काळजीपणाचा आरोपींना होऊ शकतो फायदा
- रशिया आणि युक्रेनमध्ये वाढता तणाव!
- Nanded Drugs : नांदेडमध्ये NCBची मोठी कारवाई, तब्बल 111 किलो ड्रग्ज जप्त
- WATCH : शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक