• Download App
    INDI आघाडीच्या आकड्याचे भाकीत करण्यास राहुल - प्रियांकांना वाटतेय भीती; पण म्हणतात, मोदी येणार 180 च्या खाली!! Rahul - Priyanka are afraid to predict the INDI lead figure

    INDI आघाडीच्या आकड्याचे भाकीत करण्यास राहुल – प्रियांकांना वाटतेय भीती; पण म्हणतात, मोदी येणार 180 च्या खाली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : INDI आघाडीच्या आकड्याचे भाकीत करण्यास राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना वाटतेय भीती; पण म्हणतात, मोदी येणार 180 च्या खाली!!, असे खरच घडले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी वेगवेगळ्या ठिकाणीINDI आघाडीला नेमक्या किती जागा जिंकून आणता येतील?? याचे भाकीत करायला नकार दिला आहे, पण मोदींना मात्र 180 जागा पेक्षा कमी जागा मिळतील, हे भाकीत करायला ते पुढे आले आहेत. Rahul – Priyanka are afraid to predict the INDI lead figure

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 404 आणि भाजप 370 पार असा नारा देऊन निवडणुकीत जान आणली आहे. त्यांच्या विरोधात INDI आघाडीतल्या नेत्यांनी कंबर कसून तयारी चालवली आहे, पण वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये INDI आघाडीच्या नेत्यांना तुमची आघाडी नेमक्या किती जागा मिळवेल??, हा प्रश्न विचारल्या बरोबर INDI आघाडीतले नेते माघार घेऊन दबक्या आवाजात बोलत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची आज समोर आलेली वक्तव्ये हेच दर्शवत आहेत.

    राहुल गांधींनी आज अखिलेश यादव यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी INDI आघाडीच्या नेमक्या किती जागा निवडून येतील??, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आघाडीच्या आकड्याचे भाकीत करायला नकार दिला. तसे भाकीत मी करू शकत नाही, असे ते म्हणाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आघाडी मात्र 180 च्या खाली येईल, असे वाटत होते, पण आता ते 150 च्या ही खाली येतील याची खात्री वाटत आहे. कारण देशातला अंडर करंट तसाच सांगतो आहे, असा दावा राहुल गांधींनी केला.

    प्रियांका गांधी यांनी देखील एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तशाच स्वरूपाचा दावा केला. INDI आघाडी नेमक्या किती जागा जिंकेल??, हा प्रश्न प्रियांका गांधींना पत्रकाराने विचारला. त्यावर त्यांनी आपण ज्योतिषी नसल्याने तसे भाकीत करता येणार नाही, असे उत्तर दिले. पण नरेंद्र मोदींची आघाडी मात्र 180 जागांच्या खाली येईल, असे भाकीत करून त्या मोकळ्या झाल्या. शरद पवारांनी तर, “मोदींची शक्ती कमी करायला पाहिजे,” एवढेच वक्तव्य साताऱ्या मधल्या पत्रकार परिषदेत केले. ते कुठल्या आकड्याच्या वाट्यालाच गेले नाहीत. कारण त्यांचा पक्ष देशभरातल्या एकूण लोकसभेच्या 543 जागांपैकी फक्त 10 जागांवर निवडणूक लढवतो आहे. त्यामुळे ते कुठल्या आकड्याच्या वाटेला जायच्या फंदातच पडले नाहीत.

    Rahul – Priyanka are afraid to predict the INDI lead figure

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी

    Anti-Sikh riots : शीखविरोधी दंगली; निर्दोष सुटलेल्या 6 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

    Rajnath Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत राजनाथ सिंह यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…