प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अक्षय तृतीया आणि ईद-उल-फित्र याच्या आदल्या दिवशी 2 मे रोजी नेपाळची राजधानी काठमांडूत चिनी राजदूताला बरोबर टुंगर पार्टी केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. Rahul Gandhi’s Tunger Party with Chinese Ambassador to Kathmandu Hau Yankee
नेपाळमधील चीनच्या राजदूत हाऊ यान्की यांच्यासमवेत राहुल गांधी एका झँगपँग पार्टीत दिसत आहेत. जीन्स आणि ब्ल्यू टी-शर्ट मध्ये असलेले राहुल गांधी आणि त्यांच्या सभोवती उंची दारूच्या बाटल्या यांची रास आणि शेजारी चीनी राजदूत हाऊ यान्की हे देखील दिसत आहेत.
या पार्टीत बहुतेक भारताला मोदींपासून वाचवण्यासाठी फार मोठा गंभीर विचारविनिमय होत असावा, असे खोचक ट्विट विचारवंत आणि पत्रकार एस. गुरुमूर्ती यांनी केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर जोरदार कमेंट केली असून अनेकांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.
तिकडे मोदी युरोपच्या दौऱ्यावर भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत करत आहेत. भारतीय लोक त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. रशिया – युक्रेन युद्धात मोदींनी हस्तक्षेप करून युद्ध थांबावे, अशी अपेक्षा युरोपीय देशांचे प्रमुख फक्त गरज आहेत. भारत नॉर्डिक देशांचे संमेलन होणार आहे आणि इकडे त्याच काळात राहुल गांधी चिनी राजदूता बरोबर काठमांडू टुंगर पार्टी करण्यात मग्न आहे. यातल्या विसंगतीवर अनेक युजर्सनी बोट ठेवले आहे.
Rahul Gandhi’s Tunger Party with Chinese Ambassador to Kathmandu Hau Yankee
महत्वाच्या बातम्या