विशेष प्रतिनिधी
बेमतारा : एक मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा संघर्ष पेटला असताना राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तेलंगणातून लावून धरला आहे. त्यांनी ओबीसी आरक्षण 23 % वरून 42 % वर नेण्याचे आश्वासन दिले आहे. Rahul Gandhi’s promise in Telangana for OBC
तेलंगणात बीजेपी रिश्तेदार पार्टी म्हणजेच बीआरएसचे केसीआर सरकार जाऊन प्रजालू सरकार म्हणजे काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होईलच, पण ओबीसींचे आरक्षण 23 % वरून 42 % देण्यात येईल त्यामुळे तेलंगणातील पंचायत राज समितीत मोठ्या प्रमाणावर ओबीसी लोकप्रतिनिधी होऊ शकतील. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळेल असे आश्वासन राहुल गांधींनी दिले.
राहुल गांधींनी मोदींप्रमाणेच काँग्रेसच्या गॅरंटीची भाषा वापरली. तेलंगणामध्ये केसीआर यांनी जेवढा पैसा चोरला तो सगळा जनतेला वापस करण्यात येईल यात महिलांना दरमहा 2500 रुपये, शेतकऱ्यांना वार्षिक 15000 रुपये, घरासाठी 5 लाख रुपये 200 युनिट पर्यंत मोफत वीज, कॉलेज युवकांच्या शिक्षणासाठी 5 लाख रुपये आणि 4000 रुपये पेन्शन ही काँग्रेसची गॅरंटी राहुल गांधींनी दिली.
पण सगळ्यात महत्त्वाची घोषणा त्यांनी ओबीसी आरक्षण 23 % वरून 42 % टक्क्यांपर्यंत नेण्याची केली. महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा संघर्ष पेटला असताना राहुल गांधींनी ओबीसी आरक्षण या संवेदनशील मुद्द्याला हात घालून त्याचे पडसाद महाराष्ट्र देशभर उमटतील याची पुरती “राजकीय चिथावणी” दिल्याचे दिसून येत आहे.
Rahul Gandhi’s promise in Telangana
महत्वाच्या बातम्या
- मराठा नेत्यांचा लढा जरांगेंच्या आडून; पण प्रस्थापित ओबीसी नेते लढत आहेत पुढून!!
- मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद, प्रकरणाची सुनावणी पूर्ण; शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासह सर्व १६ याचिकांवरील निर्णय राखीव
- Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- भाऊबीजेनिमित्त प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट!