• Download App
    राहूल गांधी मर्यादित बुध्दीचे, त्यांचे बोलणे ऐकून चिंता वाटायला लागते, जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल|Rahul Gandhi's limited intellect, listening to his speech makes one feel anxious, j. P. Nadda's attack

    राहूल गांधी मर्यादित बुध्दीचे, त्यांचे बोलणे ऐकून चिंता वाटायला लागते, जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधी म्हणतात बंदूक, हेलिकॉप्टर, लढाऊ विमानं खरेदी केल्यामुळे देश मजबूत होत नाही. यावरून माझी बुद्धी अडचणीत पडली आहे. चिंता वाटायला लागते की हे काय बोलत आहेत? काय विचार करत आहेत? मी तर एवढंच सांगेन की हे मर्यादित बुद्धीचे आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.Rahul Gandhi’s limited intellect, listening to his speech makes one feel anxious, j. P. Nadda’s attack

    राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर त्यांच्यावर भाजपाकडून निशाणा साधण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या भाषणात राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता.



    या पार्श्वभूमीवर देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.नड्डा म्हणाले, त्यांचे संरक्षण मंत्री ए. के. अँटनी राज्यसभेत म्हणायचे की मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की पाकिस्तानमधील पायाभूत सोयीसुविधा भारतापेक्षा चांगल्या आहेत

    आणि आपण यावर लक्ष दिलं नाही. लाज वाटेल तरी कशी? तुम्ही कामंच अशी केली आहेत. यांनी एकच ध्येय ठेवलं होतं. मिशन-कमिशन. नो कमिशन-नो खरेदी, नो कमिशन-नो रफेल, नो कमिशन-नो चिनुक(हेलिकॉप्टर). ज्यात हात टाकला, तिथे भ्रष्टाचारच केला. हेच काम यांनी केलं, अजून काही नाही. आज भारत बुलेटप्रूफ जॅकेट घेत नाहीये, तर देत आहे.

    Rahul Gandhi’s limited intellect, listening to his speech makes one feel anxious, j. P. Nadda’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India : भारताची अमेरिकेतील निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली; ऑगस्टमध्ये निर्यात 16.3% घसरून 58,000 कोटींवर

    Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीची अदानींना क्लीन चिट; अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंगचा आरोप, मार्केट व्हॅल्यू 1 लाख कोटींनी कमी झाले

    Anil Ambani : अनिल अंबानींविरुद्ध सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावरही 2,796 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप