• Download App
    राहुल गांधींची भाषा आणखी घसरली, थेट मोदींच्या जातीवर आली!!; म्हणे, मोदी ओबीसी नाहीतच, ते तेली ओपन कॅटेगरीतलेच!! Rahul Gandhi's language declined further

    राहुल गांधींची भाषा आणखी घसरली, थेट मोदींच्या जातीवर आली!!; म्हणे, मोदी ओबीसी नाहीतच, ते तेली ओपन कॅटेगरीतलेच!!

    वृत्तसंस्था

    भुवनेश्वर : देशात निर्माण झालेल्या हिंदुत्वाच्या वातावरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधींनी हिंदूंमध्ये भेदभावाची रणनीती स्वीकारली. त्यातून राहुल गांधींची भाषा आज आणखीनच घसरली. ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जातीवर आली!! Rahul Gandhi’s language declined further

    अयोध्येत राम मंदिर उभे राहिल्यानंतर देशात सगळीकडे हिंदुत्वाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या वातावरणाला छेद देण्यासाठी राहुल गांधींनी हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याची रणनीती स्वीकारत ओबीसी विरुद्ध सवर्ण जाती असे भांडण लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. भारत जोडो यात्रे ठिकठिकाणी ते ओबीसीचा मुद्दा आवर्जून मांडत आहेत.

    याच भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी खोटा पसरवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी जातीमध्ये झालाच नाही. ते गुजरातच्या तेली जातील जन्माला आले. भाजपने तेली जातीला सन 2000 मध्ये ओबीसीचा टॅग दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे ओबीसी म्हणून जन्मालाच आले नाहीत, तर ते देशात जातनिहाय जनगणना करूच कशी देतील??, असा सवाल राहुल गांधींनी यात्रेदरम्यान केला.

    पंतप्रधान मोदी सगळ्या देशाशी खोटे बोलले, की ते ओबीसी जातीत जन्माला आले. पण प्रत्यक्षात ते ओबीसी नाहीत. ते कधीच ओबीसी, दलित, पिछडा यांचा हात धरत नाहीत. त्याला मिठी मारत नाहीत. ते फक्त अदानींचा हात धरतात, असा आरोप राहुल गांधींनी केला.

    देशात जातनिहाय जनगणना फक्त काँग्रेस आणि राहुल गांधीच करेल. बाकी कुठल्याही पक्षाची ती हिंमतच नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. पण राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या तेली जातीचा थेट उल्लेख केल्याने ओबीसी समुदायात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

    Rahul Gandhi’s language declined further

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज