वृत्तसंस्था
जम्मू : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या जम्मूच्या दौऱ्यावर असून ते माता वैष्णो देवीच्या भक्तीत रंगले आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आज राहुल गांधी यांनी जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जय मातादीची घोषणा दिली. जम्मू-काश्मीरची बहु मिश्र संस्कृती नष्ट करण्याचा आरोप त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला.Rahul Gandhi’s Jammu “Jai Matadi” on Ganesh Chaturthi; Team accused of destroying Kashmiri multi-mixed culture
राहुल गांधी सध्या जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. आज जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. भाषणाची सुरुवात त्यांनी जय मातादी या जयघोषाने केली. कार्यकर्त्यांनीही या घोषणेला प्रतिसाद दिला.
जम्मू काश्मीर हे माझे घर आहे इथली संस्कृती बहु मिश्र आहे. ती नष्ट करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप करतो आहे. परंतु काँग्रेस कार्यकर्ते त्यांना यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेसचे बंडखोर नेते गुलामनबी आझाद हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण हे हिंदुत्वा भोवती केंद्रित तर होतेच. परंतु ते अधिक संघ परिवारावर टीकास्त्र सोडणारे होते.
जम्मू-काश्मीरच्या बहु मिश्र संस्कृतीचा त्यांनी वारंवार उल्लेख केला तसेच आपले पूर्वज जम्मू-काश्मीर मधून आल्याचा देखील त्यांनी अनेकदा पुनरुच्चार केला. त्रिकूट नगर मध्ये झालेल्या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगली गर्दी केली होती.
Rahul Gandhi’s Jammu “Jai Matadi” on Ganesh Chaturthi; Team accused of destroying Kashmiri multi-mixed culture