विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्यप्रदेश राजस्थानसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याबरोबर जागे होऊन काँग्रेस पक्षाने आज कार्यकारिणीची बैठक घेतली आणि त्यामध्ये काँग्रेसची सरकारे असलेल्या चार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना घोषित करून टाकली. या संदर्भातली पत्रकार परिषद राहुल गांधींनी घेतली, पण तिच्यातच ते फंबल मारून बसले आणि राजस्थान, छत्तीसगड मधली आपलीच सरकारे जातील, असे भाकीत करून राहिले!! Rahul Gandhi’s fumbled in press conference, conced defeat of Congress governments in rajasthan and chattisghar
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा राहील??, असा प्रश्न राहुल गांधींना एका पत्रकाराने विचारला. त्यावेळी राहुल गांधींनी चुकून सर्व राज्यांमधली सरकारे जातील, असे सांगितले. निवडणूक जाहीर झालेल्या राज्यांपैकी राजस्थान, छत्तीसगडमध्ये आपल्याच काँग्रेस पक्षाची सरकारे आहेत हे राहुल गांधी विसरून गेले. त्यामुळे मध्य प्रदेश मधले सरकार जाईल, छत्तीसगड मधले सरकार जाईल, राजस्थान मधले सरकार जाईल, असे ते म्हणून बसले. नंतर त्यांच्याच ते लक्षात आल्याने तुम्हीच मला कन्फ्युज केले, असे खापर त्यांनी पत्रकारांच्या डोक्यावर फोडले. त्यावेळी पत्रकार परिषदेत थोडा हशा पिकला.
काँग्रेस शासित कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना केली जाईल, असे त्यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या पत्रकार परिषदेला उपस्थित होते, पण सिद्धारामय्या वगळता बाकी कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली नाहीत.
राहुल गांधींचे जुनेच आरोप
बाकीच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी जुनेच आरोप केले. केंद्र सरकारमध्ये 90 सचिव आहेत, त्यापैकी फक्त 3 ओबीसी आहेत आणि त्यांच्या खात्यांना फक्त 5 % बजेट आहे, हा आरोप त्यांनी संसदेतल्या भाषणात केला होता, तोच आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी रिपीट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बाकीच्या सर्व गोष्टी बोलत असतात, पण जातनिहाय जनगणना या विषयावरती बिलकुल बोलत नाहीत, हा देखील आरोप त्यांनी संसदेत केला होता, तोच आरोप पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेत केला.
Rahul Gandhi’s fumbled in press conference, conced defeat of Congress governments in rajasthan and chattisghar
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!