• Download App
    राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचे "विलक्षण योगायोग" आणि गौडबंगाल!!;सोशल मीडियावर जोरदार चर्चा|Rahul Gandhi's foreign tour "wonderful coincidence" and Gaudbengal !!; strong discussion on social media

    राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचे “विलक्षण योगायोग” आणि गौडबंगाल!!;सोशल मीडियावर जोरदार चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे नियमितपणे परदेश दौऱ्यावर जात असतात. प्रामुख्याने त्यांचे खासगी दौरे असतात. परंतु या दौऱ्यात मागचा एक “विलक्षण योगायोग” आणि त्याचे नेमके गौडबंगाल काय? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.Rahul Gandhi’s foreign tour “wonderful coincidence” and Gaudbengal !!; strong discussion on social media

    फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीमध्ये दंगली भडकल्या. गाड्यांच्या प्रचंड जाळपोळी झाल्या. मोठ-मोठे जमाव झुंडीने वस्त्या वस्त्यांमध्ये शिरले. त्यांनी धुडगूस घातला. मोठा हिंसाचार केला. त्यावेळी राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर होते. तेथून त्यांनी दिल्लीच्या दंगलींचा प्रखर विरोध केला.



    दिल्लीमध्ये धार्मिक सामंजस्य आणि सौहार्द टिकावे, असे आवाहन केले आणि केंद्रातल्या मोदी सरकारला झोडपून काढले. राहुल गांधींची ही राजकीय सक्रियता दिल्लीत बसून नव्हे, तर परदेश दौऱ्यातून सुरू होती.

    त्यानंतर 2021 चा प्रजासत्ताक दिनाच्या आसपास शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीचा लाल किल्ला परिसरात मोठा दंगा उसळला. लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडे फडकले. त्यावरून देश प्रचंड प्रक्षुब्ध झाला. लाल किल्ल्याचा शेतकरी आंदोलनाशी संबंध जोडला गेला. त्यावेळी देखील राहुल गांधींनी मोदी सरकारचा जोरदार निषेध केला, पण तो देखील परदेशात राहूनच…!! त्यावेळी देखील राहुल गांधी भारतात नव्हते.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात फिरोजपूरमध्ये सुरक्षाव्यवस्थेत गोंधळ झाला. या मुद्द्यावरून देशभरात प्रचंड राजकीय गदारोळ उठला. पंतप्रधानांचा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत गोंधळ होणे त्यांचा कार्यक्रम रद्द करायला लागून माघारी फिरायला लागणे हे देशात प्रथमच घडले.

    या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले तेव्हा देखील राहुल गांधी देशात नाहीत, तर परदेशातच आहेत…!! नववर्षाच्या सुरुवातीलाच ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परत येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे.

    मात्र राहुल गांधी भारतातल्या घडामोडींबद्दल अनभिज्ञ नाहीत. दररोज ते आपल्या ट्विटर हँडल वरून मोदी सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर निशाणा साधत असतात. परंतु राहुल गांधी यांचा परदेशी दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. देशात मोठ्या घडामोडी होत असताना राहुल गांधी नेमके परदेशात कसे असतात? तेथून ते देशांतर्गत घडामोडींवर कसे लक्ष ठेवतात?, असे प्रश्न आता सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

    राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचे नेमके गौडबंगाल काय? देशात मोठी घटना घडत असताना राहुल गांधी नेमका परदेश दौऱ्याचा “योगायोग” कसा साधून घेतात? याचीही चविष्ट चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे…!!

    Rahul Gandhi’s foreign tour “wonderful coincidence” and Gaudbengal !!; strong discussion on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!