• Download App
    एकीकडे राहुल गांधींच्या अदानींवर दुगाण्या; दुसरीकडे तेलंगणात काँग्रेस सरकारच्या अदानींना पायघड्या!!|Rahul Gandhi's claims are doubled; On the other hand, in Telangana, the Congress government's Adanis are underfoot!!

    एकीकडे राहुल गांधींच्या अदानींवर दुगाण्या; दुसरीकडे तेलंगणात काँग्रेस सरकारच्या अदानींना पायघड्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी गेली दोन वर्षे अदानी समूहावर वेगवेगळे आरोप करून दुगाण्या झाडत आहेत, तर त्याचवेळी तेलंगणात गुंतवणूक वाढवण्यासाठी काँग्रेस सरकारने अदानी समूहाला पायघड्या घातल्या आहेत.Rahul Gandhi’s claims are doubled; On the other hand, in Telangana, the Congress government’s Adanis are underfoot!!

    तेलंगणचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या दावोस दौऱ्यात अदानी समूहा बरोबर 4 सामंजस्य करार करून 12400 कोटी रुपयांची गुंतवणूक तेलंगणात खेचून आणली आहे. अदानी पोर्टफोलिओ कंपनी तेलंगणा 100 मेगावॉट डाटा सेंटरच्या निर्मितीसाठी 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. अदानी ग्रीन कंपनी पंप स्टोरेज प्रोजेक्ट मध्ये 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, तर अदानी डिफेन्स आणि एरोस्पेस कंपनी राज्यात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून ड्रोन विरोधी यंत्रणा निर्मिती आणि मिसाइल कॉम्पोनंट्स निर्मितीमध्ये उतरेल. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या उपस्थितीत तब्बल 12400 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.



    एकीकडे राहुल गांधी अदानी समूहाच्या अदानी समूहावर वेगवेगळे गैरव्यवहाराचे आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करत असतात. मोदी फक्त आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा करून देण्यासाठी जनतेला लुबाडतात आणि जनतेचा पैसा उद्योगपतींच्या खिशात भरतात, असा आरोप राहुल गांधी वारंवार करत असतात, पण त्याच गौतम अदानींच्या वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर त्यांच्याच काँग्रेस पक्षाची सरकारी सामंजस्य करार करून आपापल्या राज्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करतात. तेलंगण हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

    या आधी राजस्थान मध्ये अशोक गेहलोत यांचे काँग्रेस सरकार असताना आणि मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे काँग्रेस सरकार असताना दोन्ही सरकारांनी अदानी समूहाला अशाच पायघड्या घालून त्यांच्याबरोबर गुंतवणुकीचे वेगवेगळे करार केले होते.

    पण त्यामुळेच राहुल गांधींची अदानी संदर्भातली भूमिका आणि त्यांच्या काँग्रेसच्या राज्य सरकारांची भूमिका यातली विसंगती समोर आली आहे.

    Rahul Gandhi’s claims are doubled; On the other hand, in Telangana, the Congress government’s Adanis are underfoot!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले