विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी केंब्रिजच्या लेक्चर मध्ये आणि त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी हॉलमध्ये दिलेल्या लेक्चर मध्ये भारतीय संसदेत विरोधकांचा माईक बंद केला जातो. त्यांचा आवाज दाबला जातो, असा दावा केला आहे. पण राहुल गांधी हे काय फर्डे वक्ते आहेत का??, की ज्यांचा आवाज दाबल्यामुळे जनतेपर्यंत जनतेचे फार मोठे नुकसान होईल किंवा जनता फार मोठ्या ज्ञानाला मुकेल??, असे अजिबात नाही!! Rahul Gandhi’s baseless claim that Opposition is silenced in India’s Parliament is to cover his own tardy performance as MP and exceptionally low participation in proceedings.
कारण जे राहुल गांधी संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातो, माइक बंद केला जातो, असा दावा करतात, त्यांचा संसदेतला नेमका परफॉर्मन्स किती आणि काय??, याचे अधिकृत आकडे वाचले तर त्यांचेच वाभाडे निघतील, अशीच स्थिती आहे.
– वाचा राहुल गांधींचा परफॉर्मन्स
राहुल गांधी हे संसदेत म्हणजे लोकसभेत केरळ मधल्या वायनाडचे प्रतिनिधित्व करतात. ते वायनाडचे काँग्रेस खासदार आहेत. 2014 नंतर संसदेतली अशी कित्येक अधिवेशने आहेत, जिथे राहुल गांधींची उपस्थिती “शून्य” आहे. म्हणजे संपूर्ण अधिवेशन काळात ते एकही दिवस लोकसभेत उपस्थित राहिलेले नाहीत. केरळ मधले सर्व पक्षांचे मिळून खासदार जेवढे दिवस उपस्थित राहिले, त्यापेक्षा राहुल गांधी संसदेत उपस्थित असलेली सरासरी सर्वात कमी आहे.
सर्व संसद सदस्यांनी मिळून संसदेच्या अधिवेशनात 68 चर्चांमध्ये सहभाग नोंदवला आहे. पण यापैकी फक्त 6 चर्चांच्या वेळी राहुल गांधी लोकसभेत उपस्थित होते, असे लोकसभेची अधिकृत आकडेवारी सांगते.
2019 ते 2023 या कालावधीत झालेल्या संसदेच्या अधिवेशनांमध्ये राहुल गांधींनी लोकसभेत फक्त 92 प्रश्न विचारले. केरळमधल्या सर्वपक्षीय खासदारांचे प्रश्न विचारण्याचे सरासरी प्रमाण 216 आहे आणि संपूर्ण देशातल्या सर्वपक्षीय खासदारांचे प्रश्न विचारण्याचे सरासरी प्रमाण 163 आहे.
राहुल गांधींनी 2014 पासून एकही प्रायव्हेट मेंबर बिल संसदेत सादर केलेले नाही. केरळच्या सर्वपक्षीय खासदारांनी प्रायव्हेट बिल सादर करण्याचे प्रमाण सरासरी 3.2 आहे, तर देशातल्या सर्वपक्षीय खासदारांचे हेच प्रमाण सरासरी 1.2 एवढे आहे.
… आणि संसदेत सर्वात कमी हजेरी लावणारे वायनाडचे खासदार राहुल गांधी केंब्रिजमध्ये म्हणतात, संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जातो. त्यांचा माईक बंद केला जातो!! आता या दाव्यात तथ्य किती आहे??, हे तुम्हीच ठरवा!!
Rahul Gandhi’s baseless claim that Opposition is silenced in India’s Parliament is to cover his own tardy performance as MP and exceptionally low participation in proceedings.
महत्वाच्या बातम्या