विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला गुलाम बनविणाऱ्या देशात जाऊन राहुल गांधींनी भारतद्वेषी भाषण केले आहे. त्यांचा मोदी विरोध आता भारत विरोधात परिवर्तित झाला आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधींना अमेठी मतदारसंघात पराभूत करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. Rahul Gandhi’s anti-India speech by going to a country that enslaves India
राहुल गांधींनी लंडन दौऱ्यातील केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या भाषणात भारतात लोकशाही उरली नसल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांचे ते भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या मुद्द्यावरूनच आता भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना घेरले आहेत परत येताना परत आले आहेत या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी आपल्या केंब्रिज मधल्या भाषणाबद्दल संसदेची माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका काल लोकसभेत मांडली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक भाजपचे नेते राहुल गांधींवर केंब्रिज मधल्या भाषणाबद्दल शरसंधान साधत आहेत. यात राहुल गांधींना अमेठी मतदारसंघातून पराभूत करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची देखील भर पडली आहे.
राहुल गांधींवर टीकास्त्र सोडताना स्मृती इराणी म्हणाल्या, की ज्या देशाने भारताला गुलाम बनवले आणि गुलामी मानसिकतेत कायमचे ढकलले त्या देशात जाऊन म्हणजे ब्रिटनमध्ये जाऊन राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींचा राहुल गांधींच्या मनात मोदी द्वेष आहेच, पण हाच मोदी द्वेष आता भारत द्वेषात परिवर्तित झाला आहे आणि ही सगळ्यात वाईट बाब आहे.
राहुल गांधी म्हणाले होते, की त्यांना भारतातल्या विद्यापीठात बोलू दिले गेले नाही. पण भारतातल्याच जेएनयु सारख्या विद्यापीठात जेव्हा भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा दिल्या होत्या. तेव्हा राहुल गांधी कुठे होते??, त्यांच्या पक्षाने तर त्या घोषणेचे समर्थन केले होते, अशी घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
राहुल गांधी लंडन आणि युरोप दौऱ्यावरून परतले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या केंब्रिज मधल्या भाषणावर भाजप विरुद्ध काँग्रेस अशा जोरदार सामन्याची पुढची फेरी रंगत आहे.
Rahul Gandhi’s anti-India speech by going to a country that enslaves India
महत्वाच्या बातम्या
- टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा
- Kerala : पलक्कडमध्ये भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांवर जीवघेणा सशस्त्र हल्ला!
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!
- तिजोरीवर पेन्शनचा भार पडणार तरी किती??; कोटीच्या कोटी उड्डाणांची वाचा टक्केवारी!!