विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भारतासह संपूर्ण जगभरातल्या देशांमध्ये प्रचंड आनंदोत्सव साजरा झाला. सर्व जाती धर्माच्या समुदायांनी एकत्र येऊन प्रचंड जल्लोष केला. जागतिक पातळीवर एक विक्रम प्रस्थापित झाला. अयोध्येमध्ये राम भक्तांचा प्रचंड ओघ वाढला, पण राहुल गांधींना मात्र या अभूतपूर्व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात अस्तित्वात नसलेला “जातीवाद” दिसला!! Rahul Gandhi’s anger over Pranapratistha program in Ram temple
प्रयागराज मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी राम मंदिरा विरोधात अक्षरशः जातीवादाची गरळ ओकली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींची जीभ एवढी घसरली की, त्यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांना देखील ओढले. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात देशा-परदेशातले सर्व सेलिब्रिटी सहभागी झाले असताना राहुल गांधींनी मात्र त्या कार्यक्रमांमध्ये ओबीसी, दलित, आदिवासी कोणीही नव्हते, असा खोटा टाहो फोडला.
प्रयागराज मधील जमावाला उद्देशून राहुल गांधी म्हणाले, की तुम्ही राम मंदिरातली प्राणप्रतिष्ठा पाहिलीत का?? तिथे अमिताभ बच्चन होते. ऐश्वर्या राय होती. नरेंद्र मोदी होते. पण तिथे ओबीसी, आदिवासी दलित यापैकी एकही चेहरा नव्हता. याचा अर्थच मोदींना ओबीसी, आदिवासी, दलित या कोणालाही या कार्यक्रमासाठी बोलवायचेच नव्हते. कारण त्यांना 73% समाजाला आपल्या मुख्य प्रवाहातून वगळायचे आहे. देशाचा सगळा कंट्रोल आपल्याच ताब्यात ठेवायचा आहे. या देशाची खरी मालकी ओबीसी, आदिवासी आणि दलितांची आहे. या 73% समाजाची आहे. पण देशाचा कंट्रोल त्या समाजाला मिळू द्यायचा नाही हा मोदींचा इरादा आहे. मोदींना तुम्हाला फसवायचे आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी राम मंदिरा संदर्भात जातीयवादी गरळ ओकली.
राहुल गांधींचे प्रयागराज मधले हे भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेकांनी राहुल गांधींच्या या जातीयवादी भाषणावर संतप्त होऊन जोरदार टीका केली आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमामुळे हिंदू समाजाची प्रचंड जागृती झाली. हिंदू समाजाची महाएकजूट दिसली, त्यामुळे राहुल गांधींना काँग्रेसचा कायमचा पराभव दिसायला लागला आहे. म्हणूनच ते जातीयवादी भाषेत बरळू लागले आहेत, असे टीकास्त्र अनेकांनी सोडले.
Rahul Gandhi’s anger over Pranapratistha program in Ram temple
महत्वाच्या बातम्या
- अबकी बार 400 पार वगैरे ठीक, पण मोदींनी भाजपसाठी लोकसभेत सांगितलेल्या 370 आकड्याचा नेमका अर्थ काय??
- मोदींनी लोकसभेत नेहरूंचे नाव घेतले; राहुल गांधींच्या निकटवर्ती खासदाराने सावरकरांना वादात ओढले!!
- लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा आदेश
- अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!