विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे राहुल गांधींनी गुजरात काँग्रेसमध्ये नव्या नेत्यांना काम करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे अशी वकीली केली, तर दुसरीकडे त्यांच्याच भाषणाचा हवाला देऊन अहमद पटेल यांच्या कन्येने स्वतःसाठी पक्षात काम करायची संधी मागितली. Mumtaz Patel
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते त्यावेळी अहमदाबाद मध्ये केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पक्षामध्ये लवकर चाळणी लावली पाहिजे काँग्रेसमध्ये राहून लपून छपून भाजपचे काम करणाऱ्यांना पक्षातून बाहेर घालवले पाहिजे. त्यांच्या ऐवजी नव्या नेतृत्वाला आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये मिसळून जनतेचे ऐकून घेतले पाहिजे, असे सांगितले.
राहुल गांधींच्या याच भाषणाचा हवाला देऊन अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल यांनी स्वतःसाठी पक्षात काम करण्याची संधी मागितली. गुजरात मधले नेते आपल्याला पक्षाचे काम करू देत नाहीत अशी तक्रार मुमताज पटेल यांनी केली. एकेकाळी त्यांचे वडील अहमद पटेल हे काँग्रेसमध्ये जबरदस्त पॉवरफुल नेते होते. सोनिया गांधींचे ते राजकीय सल्लागार होते. त्यांच्या चालण्या बोलण्यावर काँग्रेसची धोरणे ठरत होती. काँग्रेसमध्ये त्यांचा प्रचंड दबदबा होता. पण आता त्यांच्याच कन्येला काँग्रेसमध्ये आपल्याला कोणी काम करून देत नाही असे वाटत आहे. म्हणून त्यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये कामाची संधी मिळावी, अशी मागणी राहुल गांधींच्या भाषणाच्या निमित्ताने केली आहे.
Rahul Gandhi will meet PCC leaders, block presidents, and district presidents in Gujarat : Mumtaz Patel
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच चीनला भासली भारताच्या मदतीची गरज!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ; ४० लाखांचा होता इनाम!
- South Koreas : दक्षिण कोरियाचा सेल्फ गोल! लढाऊ विमानांनी स्वतःच्याच भागात पाडले बॉम्ब
- एम. के. स्टालिन यांना आलाय “नवे KCR” बनायचा मूड; delimitation विरोधात करताहेत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट!!