नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी एकीकडे National herald case तुरुंगाच्या वाटेवर आहेत, पण त्याचवेळी राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये जिल्हा पातळीवर अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढवून पक्षात जान फुंकायचे ठरवलेय. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काँग्रेस सेवा दलाचे पुनरुज्जीवन करून ते सेवा दल कार्यकर्त्यांचे मोहोळ बनवायचे ठरविले आहे. पण यापूर्वीच त्या मोहोळावर आणि मोहोळामध्ये गर्दी करून राहिलेल्या मधमाशा आता कमळातला मध चाखायला निघून गेल्यात, त्या परत कशा आणायच्या??, याबद्दल मात्र त्यांच्याकडे कुठली योजना दिसत नाही.
एकीकडे National herald case ची कायदेशीर धग वाढून ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुरुंगात घालण्यापर्यंत पोहोचली असताना राहुल गांधी मात्र पुन्हा गुजरात मध्ये पोहोचले होते. त्यांनी तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून काँग्रेस सेवा दल पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन केले. काँग्रेस सेवा दल हे कार्यकर्त्यांचे मोहोळ बनले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे महाअधिवेशन अहमदाबाद मध्ये पार पडल्यानंतर एका आठवड्याच्या आत राहुल गांधी पुन्हा गुजरातमध्ये गेल्याने त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीची जबाबदारी खरंच किती गांभीर्याने उचलली आहे, हे दिसून आले.
पण ती पक्ष संघटना उभारताना कार्यकर्ते आणायचे कुठून??, हा सवाल मात्र त्यांना भेडसावतो आहे, म्हणूनच त्यांनी काँग्रेस सेवा दल पुन्हा मजबूत करण्याचा इरादा व्यक्त केला.
वास्तविक नारायण सुब्बाराव हर्डीकर यांनी 1930 मध्ये उभारलेले काँग्रेस सेवा दल एकेकाळी खरंच एक बळकट संघटना होती. त्यातला “सेवा” हा शब्द त्याकाळी फार महत्त्वाचा होता. काँग्रेस सेवा दलात यायचे म्हणजे पक्षासाठी, संघटनेसाठी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी झटायचे हा त्याकाळी उदात्त हेतू असायचा. हजारो नाही तर लाखो कार्यकर्ते त्यावेळी काँग्रेस सेवा दलाचे सदस्य होते. पण काँग्रेसने सत्तारूढ झाल्यानंतर सत्तेचा कासरा मजबुतीने पकडला पण “सेवा” हा शब्द मात्र आपल्या शब्दकोशातून त्यांनी वगळून टाकला. नेहरू गांधी परिवाराच्या पूर्ण वर्चस्वाखाली गेल्यानंतर तर काँग्रेस मधला “सेवा” हा शब्द पूर्णपणे वितळून गेला. काँग्रेस सेवा दल हे काँग्रेस कार्यालयांवरच्या पाट्यांपुरते उरले.
– अटकेची टांगती तलवार
2014 नंतर तर मूळ काँग्रेसच टप्प्याटप्प्यानेच विघटीत होत गेली त्यामुळे काँग्रेस सेवा दल नावाची कुठली उपसंघटना अस्तित्वात आहे, याचा काँग्रेसच्या बड्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना विसर पडला होता. दरम्यानच्या काळात काँग्रेस मधले मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सगळे नेते कमळाच्या आश्रयाला निघून गेले. त्या कमळातला मिळेल, तसा सत्तेचा मध चाखू लागले. आता जेव्हा काँग्रेस सेवा दल नावाची उपसंघटना अस्तित्वातच आहे की नाही, याचीच शंका उत्पन्न झाली आहे, त्यावेळी राहुल गांधींना त्या उपसंघटनेची आठवण झाली आणि काँग्रेस सेवा दल हे कार्यकर्त्यांचे मोहोळ झाले पाहिजे, असे उद्गार त्यांनी काढले. पण त्या मोहोळावर आणि मोहोळाच्या आत गर्दी करून राहिलेल्या मधमाशा काळातला मध चाखायला निघून गेल्यात, त्या परत कशा आणायच्या याची कुठलीही उपाययोजना राहुल गांधींकडे नाही. शिवाय National hiral case मध्ये तुरुंगात जाण्याची त्यांच्या डोक्यावर तलवार लटकली आहे, ती वेगळीच!!
Rahul Gandhi wants to make Congress seva dal strong
महत्वाच्या बातम्या
- कृत्रिम बुद्धिमत्तेची “कमाल”, नाशकात बाळासाहेब गरजले; पण उद्धवचे स्क्रिप्ट “वाचून” भाजपला धुवावे लागले!!
- Kiren Rijuju : ‘बंगालच्या मुख्यमंत्री वक्फच्या नावाखाली हिंसाचार भडकावत आहेत – किरेन रिजिजू
- Assam : तमिळ-मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये आसामी भाषा सक्तीची
- Waqf Act : ‘पाकिस्तानने स्वतःच्या खराब रेकॉर्डकडे लक्ष द्यावे’, वक्फ कायद्याविरोधात बोलणाऱ्याला भारताने फटकारले!