• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधींचा "व्होकल फॉर लोकल" धोरणाचाच प्रचार; पण फक्त मोदींना "डिस्क्रेडीट" करून!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचा “व्होकल फॉर लोकल” धोरणाचाच प्रचार; पण फक्त मोदींना “डिस्क्रेडीट” करून!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणातील गोहाना मधील प्रचार सभेत तिथल्या प्रसिद्ध जिलब्या निर्यात करायची बात केली. त्यावरून राहुल गांधींना जिलब्या या पदार्थातले कसे काही कळत नाही, त्या जिलब्या गरमागरम खाण्यातच मतलब असतो. जिलब्या निर्यात करून त्या थंडगार होतील मग त्याला काय अर्थ उरेल??, वगैरे सवाल अनेकांनी सोशल मीडियावर विचारले. Rahul Gandhi vocal for local

    सोशल मीडियातील टीकेची दखल घेऊन राहुल गांधींनी आपला जिलब्या निर्यातीचा पर्याय इतर काही भारतीय वस्तूंनाही लागू केला. व्हाट्सअप चॅनेलवर त्यांनी तशी पोस्ट केली. प्रत्यक्षात राहुल गांधींनी या निमित्ताने मोदी सरकारच्या “व्होकल फॉर लोकल” याच धोरणाचा पुरस्कार केला. पण आपण मोदींच्या धोरणाचा पुरस्कार केला हे मात्र त्यांनी दाखविणे टाळले. उलट त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

    गोहनाच्या जिलब्या, काश्मीरमधील सोपोरचे सफरचंद, मेघालयाचा अननस, बिहारचा मखाना, कोल्हापूरी चप्पल, बेल्लारीच्या जीन्स मुरादाबादच्या पितळी वस्तू अशा कितीतरी गोष्टी भारताला निर्यात करता येऊ शकतील. भारतात अशा स्थानिक वस्तूंची किमान 5500 क्लस्टर्स बनवता येतील. पण मोदी सरकार तसे धोरण आखत नाही. त्यामुळे स्थानिक सर्वोत्तम उत्पादने जगाच्या बाजारात पोहोचत नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.

    वास्तविक मोदी सरकारने सणावारांच्या मोसमात “व्होकल फॉर लोकल” या वस्तूंचा प्रचार करून चिनी मार्केटला मोठा दणका दिलाच. पण “मेक इन इंडिया” सारख्या धोरणात्मक विषयातून जागतिक पातळीवरच्या उत्पादनाला चालना दिली. त्याचवेळी स्थानिक कलावंतांना कामगारांना प्रोत्साहन देणाऱ्या विश्वकर्मा योजना सारख्या योजनांमधून आधीच स्थानिक उत्पादनांची क्लस्टर्स निर्माण केली. खादी उत्पादनांची निर्यात वाढवली. त्याचे प्रतिबिंब केंद्रीय बजेटमध्ये देखील पडले.

    पण लोकसभेतले विरोधी पक्षनेते असणाऱ्या राहुल गांधींना हे सगळे मोदी सरकारने केल्याचे कबूल करता येणे कठीण होते. त्यामुळे त्यांनी गोहानाच्या जिलब्या निर्यात करण्याच्या विषयातून वेगळ्या भाषेत “व्होकल फॉर लोकल” याच संकल्पनेचा प्रचार केला. फक्त त्याचे क्रेडिट त्यांनी मोदी सरकारला दिले नाही. कारण राजकीय दृष्ट्या त्यांना ते परवडणारे नाही.

    Rahul Gandhi vocal for local

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi-adityanath : ‘आम्ही कुणालाही छेडणार नाही, पण जर का कुणी आम्हाला छेडलंच तर…’

    Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानचे नापाक कृत्य, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांकडून पर्यटनावर बहिष्कार

    United nations : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्राकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हटले…