प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित झालेले खासदार राहुल गांधी उद्या आपला निवडून आलेला लोकसभा मतदारसंघ वायनाड मध्ये रोड शो करणार आहेत. एक खासदार म्हणून सध्या तरी त्यांचे वाहनाडशी नाते उरले नसले तरी नेता म्हणून ते या मतदारसंघाशी नाते टिकवून ठेवू इच्छितात, हेच या रोड शो मधून राहुल गांधी जनतेच्या मनावर ठसवणार आहेत. Rahul Gandhi to hold road show in waynad tomorrow
राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयात आपल्याला झालेल्या शिक्षेविरुद्ध अपील केले आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयात त्यांना खासदारकी टिकवण्यासाठी अपील करावे लागणार आहे. ही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पण ही प्रक्रिया सुरू असतानाच वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चर्चा राजकीय पातळीवर सुरू झाल्याने राहुल गांधींनी वायनाडचा दौरा आखला आहे. या दौऱ्यात रोड शो, जनता संवाद असे भरगच्च कार्यक्रम असतील.
Rahul Gandhi : राहुल गांधींची काठमांडूत चिनी राजदूत हाऊ यान्की बरोबर टुंगरपार्टी!!
तत्पूर्वी आज कर्नाटकच्या कोलार मध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम होणार होता. परंतु कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राहुल गांधी यांना कोलारचा कार्यक्रम रद्द करा, असा सल्ला दिला. त्यानंतर डी. के. शिवकुमार यांची 24 तासांच्या आत काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झाली आणि आता राहुल गांधी हे उद्या वायनाडचा दौरा करून तिथे रोड शो करणार आहेत.
वायनाड मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली तर त्यांच्या ऐवजी प्रियांका गांधी या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात आहे. अर्थात या चर्चेला अधिकृत पातळीवर काँग्रेस मधून कोणी दुजोरा दिलेला नाही. पण वायनाड मध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली, तर उमेदवार कोण असणार याच्या सर्वसामान्य जनतेच्या उत्सुकते बरोबरच काँग्रेस मधील चिंता वाढविणारीच ही बाब आहे. कारण राहुल गांधींचा अमेठी, सोनिया गांधींचा रायबरेली हे दोन मतदारसंघ 2014 पूर्वी फिक्स्ड होते. 2019 मध्ये मात्र राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाला. पण त्यावेळी त्यांनी राजकीय चतुराई साधून वायनाड मधूनही उमेदवारी केली म्हणून ते लोकसभेत तरी पोहोचू शकले.
आता जेव्हा त्यांनी वायनाडची खासदारकी गमावली आहे, त्यावेळी जर तिथे पोटनिवडणूक झाली आणि प्रियांका गांधींना उमेदवारी करावी लागली, तर 2024 मध्ये सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघात उमेदवार कोण??, हा प्रश्न तयार होणार आहे. कारण सोनिया गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार नाहीत हे त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव आधीच जाहीर केले आहे. अशा स्थितीत सोनिया आपला मतदारसंघाचा राजकीय वारसा प्रियांका गांधी यांच्याकडे सोपवणार अशी आधी चर्चा होती. पण त्या ऐवजी जर त्यांना वायनाड मधून लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी करावी लागली, तर अमेठी हातची गेली आणि रायबरेलीही गेली अशी गांधी परिवाराची स्थिती होऊ शकते. त्यामुळे एकूण काँग्रेसला मतदारसंघ फेरव्यस्थापनात गांधी परिवार कुठे फिट करायचा याची फार मोठी चिंता लागणार असल्याचे दिसून येते.
पण त्यापूर्वी राहुल गांधी स्वतःच वायनाडचा दौरा करून ते सुरतच्या कायदेशीर कचाट्यातून सुटल्यास आपला तिथला “क्लेम” कायम ठेवण्याच्याच मागे लागले आहेत, हे स्पष्ट आहे.
Rahul Gandhi to hold road show in waynad tomorrow
महत्वाच्या बातम्या