विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिटन दौऱ्यात केंब्रिजमध्ये जेव्हा भारतात लोकशाही नसल्याचे लेक्चर दिले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानी कमाल मुनीर बरोबर स्टेज शेअर केले होते!! Rahul Gandhi shared stage with kamal munir, Pakistani origin cambridge official
राहुल गांधींनी भारतातल्या लोकशाही व्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले. 2014 नंतर भारतात लोकशाही उरली नाही. सर्व लोकशाही संस्था फॅसिस्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताब्यात घेतल्या. भारतात सरकारच्या निर्णयावर बोलायला बंदी आहे. तुम्ही कुठेही जाऊ शकता. पण सरकार विरुद्ध बोलू शकत नाही, असे असहिष्णु वातावरण भारतात पसरले आहे. भारतात दलित, अल्पसंख्यांक दबावाखाली आहेत. भयग्रस्त आहेत, अशी जोरदार भाषणबाजी राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केली.
त्यावेळी हेच पाकिस्तानी कमाल मुनीर त्यांच्या स्टेजवर होते. कमाल मुनीर सध्या केंब्रिज विद्यापीठाचे प्र कुलगुरू आहेत आणि प्र कुलगुरू या नात्यानेच ते राहुल गांधीं बरोबर स्टेजवर हजर होते. हेच ते कमाल मुनीर आहेत, ज्यांना पाकिस्तानी सरकारने “तमघा ए इम्तियाज” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कमाल मुनीर हे केंब्रिज विद्यापीठाच्या पॉलिसी अँड स्ट्रॅटेजिक अफेअर्स डिपार्टमेंटचे देखील प्रमुख आहेत. याच कमाल मुनीर यांनी मुलाखतकार या स्वरूपात राहुल गांधींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत देखील राहुल गांधींनी भारतात लोकशाही नसल्याचे तर्कट देऊन बरेच दावे केले होते.
Rahul Gandhi shared stage with kamal munir, Pakistani origin cambridge official
महत्वाच्या बातम्या
- PMPML महिलांना घडवणार दर महिन्याचा 8 तारखेला मोफत प्रवास
- केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा
- गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत
- नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती