• Download App
    गांधी परिवाराची नवी शिवी; PM मतलब पनौती मोदी; कुछ भी हो जाये, हम नही सुधरेंगे!!; हीच काँग्रेसी रणनीती rahul gandhi says to pm modi  means panauti

    गांधी परिवाराची नवी शिवी; PM मतलब पनौती मोदी; कुछ भी हो जाये, हम नही सुधरेंगे!!; हीच काँग्रेसी रणनीती

    विशेष प्रतिनिधी

    बारमेर : कुछ भी हो जाये हम नही सुधरेंगे!!, हे गांधी परिवाराने ठरवूनच टाकले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने शिव्या देऊ नका. त्याचा काँग्रेसला तोटा होतो. काँग्रेस सतत खोल खड्ड्यात जाते, असे काँग्रेस मधल्या गांधी परिवाराच्या कानी कपाळी ओरडून निवडणूक रणनीतीकार थकले. पण गांधी परिवार सुधारायला तयार नाही, याचे प्रत्यंतर राजस्थानातल्या बारमेर विधानसभा मतदारसंघात आले. rahul gandhi says to pm modi  means panauti

    बारमेर विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींनी घेतलेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत मोदींना नाही नाही त्या शिव्या दिल्या. त्यांना आणि अदानींना खिसेकापू म्हटले, इतकेच नाही तर, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नवी शिवी देखील शोधून काढली, ती म्हणजे PM मतलब पनौती मोदी!!

    गुजरात मध्ये 2007 च्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना “मौत के सौदागर” ही शिवी दिली होती, पण त्या शिवीचा सगळा उलटाच परिणाम झाला आणि काँग्रेस कायमची घरी बसली. ती अजून सत्तेवर परतू शकलेली नाही. पण यातून गांधी परिवार कुठलाही धडा शिकला नाही. मोदींना शिव्या द्यायचे त्यांनी कमी केले नाही.

    बारमेरच्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ज्यावेळी दोन खिसेकापूंना तुमचा खिसा कापायचा असतो, त्यावेळी त्यातला पहिला खिसेकापू तुमच्यासमोर येतो. तुमच्याशी गप्पा मारायला लागतो. तुमचे ध्यान इकडे तिकडे भटकवायला लागतो. मग मागून दुसरा खिसेकापू येतो आणि खिसा कापून निघून जातो. भारतात सध्या सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे?, तर बेरोजगारी, गरीबी आणि महागाई. पण पंतप्रधान मोदी तुमच्या समोर येतात. तुमच्याशी हिंदू – मुस्लिम या विषयावर बोलतात. भेदभाव निर्माण करतात. तुमचे ध्यान भटकवतात. अदानी मागून येतात आणि तुमचा खिसा कापून नेतात. मोदी तुमच्या समोर येऊन बोलतात. कधीकधी ते क्रिकेट मॅच पाहायला जातात, पण आपल्याच टीमला हरवून येतात. कारण PM मतलब पनौती मोदी!!

    राजस्थानात विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे. त्यावेळी नेमके PM मतलब पनौती मोदी ठरतात??, की राहुल गांधी हेच काँग्रेससाठी पनौती ठरतात??, हे दिसून येणार आहे!!

    rahul gandhi says to pm modi  means panauti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य