प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी 28 मे 2023 रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. नेमका त्याच दिवशी “राजकीय योगायोग” साधत राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर निघत आहेत. त्यामुळे ते स्वतः संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होतील किंवा नाही याविषयी शंका आहे. Rahul Gandhi opposes the inauguration of the new Parliament House by the Prime Minister
पण राहुल गांधींनी आता नव्या संसद भवनाच्या मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोध दर्शवला आहे. नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावे. पंतप्रधानांच्या हस्ते नको, असे ट्विट राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडल वरून केले आहे.
संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस हा नेमका सावरकर जयंतीचा निवडणे याला देखील काही काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे, पण आता त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध दर्शवत आपली विशिष्ट मानसिकता स्पष्ट केली आहे.
Rahul Gandhi opposes the inauguration of the new Parliament House by the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार
- बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!
- भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ओडिशातील एक कोटी कुटुंबांशी साधणार संपर्क