• Download App
    "मिमिक्रीवीर" खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!! Rahul Gandhi lashed out at the media

    “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!, असे आज राजधानीतील काँग्रेसच्या मुख्यालयात घडले. Rahul Gandhi lashed out at the media

    त्याचे झाले असे :

    तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकवडे यांची संसदेच्या पायऱ्यांवर उभे राहून मिमिक्री केली. त्यावेळी त्यांच्याभोवतीचे खासदार खिदळले, पण त्याच वेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी त्या सगळ्या मिमिक्रीचा व्हिडिओ काढला आणि प्रकरण पेटले.

    घटनात्मक पदसिद्ध अधिकाऱ्याची मिमिक्री करणे हा शिस्तभंग आहे आणि ते वर्तनही संसदीय औचित्याचा भंग आहे. त्यामुळे एकीकडे जगदीप धनखड यांचा जाट शेतकरी समाज संतापला. काँग्रेस आणि तृणामूळ काँग्रेस या दोन पक्षांविरुद्ध उत्तर प्रदेश हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये वातावरण तापले. स्वतः जगदीप धनखड यांनी देखील राज्यसभेत जगदीप धनखड नावाच्या व्यक्तीचा कितीही अपमान करा तो मी सहन करेन, पण उपराष्ट्रपतीपदाचा अपमान मी सहन करणार नाही, अशी परखड भूमिका घेतली.

    त्याचवेळी सुप्रीम कोर्टातले वकील विनीत जिंदल यांनी संसदीय संसदेच्या शिस्तभंग समितीसमोर कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींच्या बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांची खासदारकी रद्द करण्याचा अर्ज केला. त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपराष्ट्रपतींच्या अपमानाची दखल घेऊन संबंधित खासदारांना परखड शब्दांमध्ये समज दिली.

    पण तरीदेखील कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींची हेकडी कायम राहिली. कल्याण पॅनलजींनी आपल्याला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता,असे सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची बॉडी लँग्वेज मात्र जगदीप धनखड यांची खिल्ली उडवण्याचीच राहिली. त्यानंतर राहुल गांधींनी या सर्व प्रकरणाचे खापर मीडियावर फोडले.

    आजच्या दिवसाच्या सुरुवातीला आज राहुल गांधींनी आपण या विषयावर कमेंट करणार नाही, असे मीडियाला संसद परिसरात सांगितले होते, पण दुपारी मात्र 24 अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात शिरतानाच पत्रकारांनी त्यांना अडवले आणि त्यांच्याविरुद्ध संसदीय शिस्तभंग समिती कडे केलेल्या अर्जाची माहिती दिली. त्यावेळी राहुल गांधींनी प्रतिक्रिया लगेच बदलली कारण त्यांच्या खासदारकीवरच गंडांतर आले.

    मी फक्त व्हिडिओ काढला

    राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींच्या अपमानावर अपमान प्रकरणाचे सगळे खापर मीडियावर फोडले. संसदेतल्या 150 खासदारांना संसदेबाहेर फेकून दिले, त्याची चर्चा मीडिया करत नाही. अदानी – राफेल या मुद्द्यांवर चर्चा करत नाही. निलंबित झालेले खासदार संसदेबाहेर दुःखाने बसून आहेत, त्यावर मीडिया काही बोलत नाही. बेरोजगारीवर बातम्या देत नाही, फक्त उपराष्ट्रपतींच्या कथित मिमिक्रीचाच मुद्दा लावून धरतात. त्या मिमिक्रीचा व्हिडिओ मी काढला. पण तो माझ्या मोबाईल मध्येच आहे. तो मी व्हायरल केला नाही. मीडियाने बाकीचेच व्हिडिओ व्हायरल केले म्हणून हे प्रकरण पेटले, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मीडियावर खापर फोडले.

    Rahul Gandhi lashed out at the media

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य