• Download App
    एलन मस्कने टाकली EVMs वरून काडी; काँग्रेस सह विरोधकांची आग भडकली!! Rahul Gandhi joins EVM debate after Elon Musk flags hacking risk

    एलन मस्कने टाकली EVMs वरून काडी; काँग्रेस सह विरोधकांची आग भडकली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले “इक्वेशन” असल्याचा दावा करणाऱ्या एलन मस्कने भारतातल्या लोकसभा निवडणुका सुरक्षित आणि सुखरूप पार पडल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs वरून काडी टाकली. त्यामुळे काँग्रेस सह विरोधकांची आग भडकली. Rahul Gandhi joins EVM debate after Elon Musk flags hacking risk

    वास्तविक लोकसभा निवडणुकीदरम्यानच नेहमीप्रमाणे EVMs चा विषय चर्चेत होताच. भाजपच्या विरोधकांना पराभवाचा झटका बसला की EVMs विरुद्ध बोंबाबोंब आणि रडारड करण्याची त्यांना सवय होतीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी केलेल्या घोषणेनुसार ते 400 पार झाले असते, तर काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी EVMs विरुद्ध मोठी बोंबाबोंब केली असती, अशा बातम्या माध्यमांमध्ये चालल्या होत्याच, पण प्रत्यक्षात निकाल वेगळाच आला. मोदींचे 400 पार बाजूलाच राहिले, उलट त्यांना 272 गाठता आले नाही, पण एवढे होऊनही 294 जागांसह मोदींचेच सरकार बनले आणि काँग्रेसला 99 जागांवर समाधान मानावे लागले. सगळे विरोधक मिळून 234 वर थांबले.

    पण या सगळ्या प्रकारात विरोधकांची चांगलीच कोंडी झाली. एकीकडे मोदी सरकार आले तरी ते तोकड्या बहुमतानिशी आले आणि विरोधकांनाही डोकं वर काढण्याची संधी मिळाली. त्यामुळे EVMs वर बोंबाबोंब करण्यासाठी पुरेसे कारणच उरले नाही. त्यामुळे लोकसभेचे निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटले तरी EVMs वर बोंबाबोंब झाली नाही.

    पण आता एलन मस्कने या जगात काहीही हॅक होऊ शकते. त्यामुळे EVMs सारखा “ब्लॅक बॉक्स” हॅक करणे अवघड नाही, अशी काडी टाकली. त्याबरोबर विरोधकांची आग भडकली. राहुल गांधी यांनी पुढे येऊन एलन मस्क यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. त्या पाठोपाठ बाकीचे काँग्रेस नेतेही पुढे सरसावून EVMs विरुद्ध बोंबाबोंब करायला लागले. अर्थातच भाजप नेत्यांनी त्यांना सोडले नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने विरोधकांची जी कोंडी केली होती, ती कोंडी मात्र एलन मस्कने काडी टाकून फोडली. त्यामुळे विरोधकांना EVMs विरुद्ध बोंबाबोंब करण्याची संधी मिळाली.

    Rahul Gandhi joins EVM debate after Elon Musk flags hacking risk

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य