विशेष प्रतिनिधी
भोपाळ : राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही, अशी टीका भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. Rahul Gandhi is drowning the Congress, we don’t need to do anything as long as he is there, criticizes Shivraj Singh Chouhan
पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना चौहान म्हणाले, पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवले. सध्या राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत.
पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये काय स्थिती आहे हे आपण सर्व पाहतो आहे. तेथे सुरू असलेल्या राजकीय घडामोडी चिंताजनक आहेत. कारण पंजाब सीमेवरील राज्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी पंजाबमध्ये स्थिरता राहणं अनिवार्य आणि महत्त्वाचं आहे.
Rahul Gandhi is drowning the Congress, we don’t need to do anything as long as he is there, criticizes Shivraj Singh Chouhan
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझे याची होणार तळोजा कारागृहाच्या रुग्णालयात रवानगी; घरीच नजरकैदेत ठेवण्याचे अपील फेटाळले
- नाही – नाही म्हणत कॅप्टन साहेब पोहोचले अमित शहांकडे; पंजाबच्या राजकीय भूकंपाचा तिसरा अंक सुरू
- तिकडे पंजाब काँग्रेसमध्ये मानापमान, तर इकडे कॅप्टन दिल्लीत अमित शहांच्या भेटीला, पक्ष प्रवेशावर चर्चा?
- भाजप किसान मोर्चा साखर संकुलवर धडकला एकरकमी FRP देण्याची आग्रही मागणी