विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. पण त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या खासदारकीचा मुद्दा कायदेशीर दृष्ट्या कोर्टात लढण्यापेक्षा राजकीय बनवून रस्त्यावर लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी खासदारकी गमावण्याचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी काँग्रेसने देशभर संकल्प सत्याग्रह सुरू केला आहे. Rahul Gandhi is a post graduate from Harvard – Cambridge, but made him pappu
या संकल्प सत्याग्रहात भाषण करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी किती उच्चशिक्षित आहेत, याचा दावा केला आहे. राहुल गांधी जगातल्या दोन सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकून आले आहेत. ते हार्वर्ड आणि केंब्रिजचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे केंब्रिज विद्यापीठातली अर्थशास्त्राची एम फिल डिग्री आहे, असा दावा प्रियांका गांधी यांनी भाषणात केला आहे.
पण या संदर्भात खुद्द राहुल गांधींच्याच निवडणूक प्रतिज्ञा पत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या त्या प्रतिज्ञापत्रांमध्ये हार्वर्ड अथवा केंब्रिज मधल्या कुठल्याही डिग्रीचा अजिबातच उल्लेख नाही, असे आढळले आहे. कोणतीही निवडणूक लढवताना संबंधित उमेदवाराकडे त्याच्या व्यक्तिगत शिक्षण आणि ज्ञात अर्थ स्त्रोतांचे विवरण मागितले जाते या विवरणात राहुल गांधींनी त्यांच्या केंब्रिज अथवा हार्वर्ड बदल्या शिक्षणाचा उल्लेख केलेला नाही. मग राहुल गांधी केंब्रिजचे अर्थशास्त्रातले पोस्ट ग्रॅज्युएट कधी झाले??, हा खरा प्रश्न आहे.
Rahul Gandhi is a post graduate from Harvard – Cambridge, but made him pappu
महत्वाच्या बातम्या
- सनातन संस्था ही काही दहशतवादी संघटना नाही, आरोपींना जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
- पत्रकाराचा ‘भाजप कार्यकर्ता’ असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध
- युक्रेनशी युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा- बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार रशिया
- Mission Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेश भाजपची नवी टीम जाहीर; १८ उपाध्यक्ष आणि सात सरचिटणीसांच्या नावांची यादी जाहीर