विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधींनी आज जरी अदानी समूहावर काही आक्षेप नोंदवले असले, तरी राहुल गांधींसह संपूर्ण गांधी परिवाराचे देशातल्या आणि प्रदेशातल्या उद्योगपतींची निकटचे संबंध आहेत. पण त्याचवेळी राहुल गांधींनी पदेशात जाऊन अनिष्ट व्यावसायिकांच्या (undesirable businessmen) भेटी घेतल्याच्याही घटना घडल्या आहेत, असा आरोप काँग्रेस मधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.
Rahul Gandhi has ties with ‘undesirable businessmen’: Ghulam Nabi Azad
राहुल गांधींनी अदानींच्या शेल कंपनीत आलेले 20000 कोटी रुपये कुणाचे?, हा सवाल लावून धरला आहे. त्यावरून देशात राजकीय गदारोळ उठला आहे. भाजप नेत्यांपासून शरद पवारांपर्यंत अनेकांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तरी देखील राहुल गांधींनी अदानी मुद्दा सोडलेला नाही.
या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांनी देखील त्यांचे विशिष्ट मत व्यक्त केले असून त्यामध्ये राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे अनेक उद्योगपतींशी संबंध असल्याचा मुद्दा मांडला आहे. राहुल गांधी आणि गांधी परिवाराचे देशातच नव्हे तर पदेशात अनेक उद्योगपतींची निकटचे संबंध आहेत. अशी दहा उदाहरणे मी सांगू शकतो. इतकेच नाही तर राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यात अनेक अनिष्ट व्यावसायिकांना भेटले आहेत याचीही माहिती आहे, असे वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी एका मुलाखतीत केले आहे.
आझाद यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यात कोणत्या अनिष्ट व्यावसायिकांना भेटतात याचे उत्तर काँग्रेसकडे आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये सत्तेवर राहिलेल्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढते याकडेही रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे.
राहुल गांधी – सोरोस भेट
मध्यंतरी राहुल गांधींनी आपल्या लंडन दौऱ्यामध्ये भारतात लोकशाही नसल्याची भाषणे केली होती. पण याच दौऱ्यात त्यांनी जॉर्ज सोरोस यांच्या पत्नीची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचबरोबर पाकिस्तानी वंशाच्या काही बुद्धिवाद्यांबरोबर त्यांच्या बैठका झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. गुलाम नबी आझाद यांचा अंगुली निर्देश राहुल गांधी आणि सोरोस यांच्या भेटीकडे तर नाही ना??, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Rahul Gandhi has ties with ‘undesirable businessmen’: Ghulam Nabi Azad
महत्वाच्या बातम्या