वृत्तसंस्था
हैदराबाद : केंद्रातल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची बी टीम, सी टीम, डी टीम अशी एकमेकांना नावे ठेवता ठेवता काँग्रेस खासदार राहुल गांधींनी तेलंगण मधल्या सत्ताधारी BRS अर्थात भारत राष्ट्र समितीला आज नवे नाव ठेवले. त्यांनी BRS ला भाजपची बी टीम, सी टीम किंवा डी टीम म्हटले नाही, तर भारत राष्ट्र समितीला बीजेपी रिश्तेदार समिती, असे नाव दिले!! Rahul Gandhi has given a new name to the ruling BRS in Telangana, BJP Kinship Samiti
हैद्राबादेत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी झालेल्या मोठ्या जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधींचे मुख्य भाषण झाले आणि त्यामध्ये त्यांनी तेलंगणवासीयांना सहा गॅरेंटी दिल्या. त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी तेलंगणा मधील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे वाभाडे काढले.
राहुल गांधी म्हणाले, की केंद्रातले भाजप सरकार आणि तेलंगणा मधले सरकार यांच्या मैत्री संबंधच आहेत. ते एकमेकांचे खोटे विरोधक आणि खरे मित्र आहेत. त्यामुळेच मी BRS ला भारत राष्ट्र समिती म्हणत नाही, तर बीजेपी रिश्तेदार समिती म्हणतो. देशातल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पाठीमागे केंद्र सरकार हात धुवून लागले आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्यासारख्या संस्था विरोधी पक्षांच्या नेत्यांना छळतात. पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या परिवाराविरुद्ध ते एकही केस करत नाहीत. वास्तविक तेलंगणात सरकारी भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, पण भाजप सरकार त्याकडे डोळे झाक करते. याचा अर्थच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बीजेपी रिश्तेदार समितीचे अध्यक्ष आहेत.
तेलंगणाला काँग्रेसने स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तो काही मुख्यमंत्र्यांच्या परिवाराला लाभ देण्यासाठी नाही, तर तेलंगण मधल्या गरीब दीन दलित जनतेला न्याय देण्यासाठी आणि त्यांचे हक्काचे राज्य देण्यासाठी त्यांना राज्याचा दर्जा दिला. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा पूर्ण गैरफायदा घेतला, असे शरसंधान राहुल गांधींनी साधले.
एरवी काँग्रेस सह सर्व प्रादेशिक पक्ष एकमेकांना भाजपची ए टीम, बी टीम, सी टीम असे संबोधून वाभाडे काढतात, पण यावेळी प्रथमच राहुल गांधींनी नवी आयडियेची कल्पना लढवत BRS ला बीजेपी रिश्तेदार समिती नाव देऊन तेलंगणाच्या राजकारणात नवी खुमारी आणली आहे. आता BRS या नव्या ठेवलेल्या नावाचा प्रतिकार करताना राहुल गांधींना कसे प्रत्युत्तर देते??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Rahul Gandhi has given a new name to the ruling BRS in Telangana, BJP Kinship Samiti
महत्वाच्या बातम्या
- Asia cup : गणपती बाप्पा मोरया, लंकेचा वाजला बोऱ्या; आशिया चषकात भारताचा अष्टकार!!
- अमृता शेरगिलच्या पेंटिंगचा 61.8 कोटींना लिलाव; रझांचे रेकॉर्ड तोडले!!
- संसदेच्या नवीन इमारतीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी फडकवला तिरंगा
- पंतप्रधान मोदींनी जन्मदिनी देशाला दिली ‘यशोभूमी कन्वेशन सेंटर’ आणि विश्वकर्मा योजनेची भेट!