विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Iltija Mufti’ राहुल गांधींच्या पाठोपाठ इल्तिजा मुफ्तीचे सावरकरांविरुद्ध गरळ हिंदुत्व ही “बिमारी” असल्याचे केले दोषारोपण!!Iltija Mufti’
राहुल गांधी तर गेले काही वर्षे सातत्याने सावरकरांविरुद्ध गरळ ओकतच होते, पण आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती हिने सावरकरांविरुद्ध गरळ ओकली. हिंदुत्वाला ती “बिमारी” म्हणाली.
मध्य प्रदेशातल्या एका घटनेचा उल्लेख करून इल्तिजा मुफ्तीने दोनच दिवसांपूर्वी ट्विट केले होते. कुणी जय श्रीराम म्हटले नाही म्हणून तुम्ही जर मुस्लिम मुलाला मारत असाल, तर तुमचे हिंदुत्व ही “बिमारी” आहे आणि ती देशातल्या लाखो लोकांना लागली आहे, असा आरोप इल्तिजाने केला होता. त्यानंतर ती सोशल मीडियात जबरदस्त ट्रोल झाली. अनेकांनी तिच्यावर जोरदार टीका केली.
त्यानंतर इल्तिजाने आपली भाषा बदलली. आपण हिंदू धर्माला नव्हे, तर हिंदुत्वाला “बिमारी” म्हटलो असा दावा तिने केला. त्याचवेळी त्यांनी वीर सावरकरांवर गरळ ओकली. सावरकरांनी म्हणे 1940 मध्ये हिंदुत्वाच्या आधारे हिंदू मुसलमान भेद केला हा देश फक्त हिंदूंचा आहे, असा प्रचार – प्रसार केला. मुसलमानांविरुद्ध देशात द्वेष भडकवला, असा दावा करून इल्तिजाने हिंदुत्व ही “बिमारी” असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. भाजप हिंदुत्वाच्या आधारे देशभर द्वेष फैलावत असल्याचा आरोप तिने केला.
त्यावर जम्मू काश्मीर विधानसभेतले विरोधी पक्षनेते भाजपचे रवींद्र रैना भडकले. त्यांनी इल्तिजा मुफ्ती हिने ताबडतोब माफी मागावी. हिंदू धर्म आणि हिंदुत्व यावर खोटे भेद निर्माण करू नयेत. सार्वजनिक जीवनातील सभ्यता पाळून महान व्यक्तींवर टीका करावी, अशा शब्दांमध्ये रवींद्र रैना यांनी सुनावले.
Rahul Gandhi followed by Iltija Mufti’s row against Savarkar; Allegation that Hinduism is a “disease”!!
महत्वाच्या बातम्या
- CM Devendra Fadnavis : याला म्हणतात आकड्यांची गुगली; गणित कच्चं असलेल्या विद्यार्थ्याने मास्तरचीच विकेट काढली!!
- Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरचे मंत्री म्हणाले, रोहिंग्यांना वीज अन् पाणी पुरवणे हे सरकारचे कर्तव्य
- Subhash Ghai : चित्रपट निर्माते सुभाष घई यांची प्रकृती चिंताजनक
- CM Fadnavis’ : शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, लोकसभेत मिळालेली मते दाखवली