नाशिक : देशात बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 45 वर्षांत सर्वात जास्त आहे. देशातली देशातल्या 70 कोटी जनतेच्या संपत्ती एवढी संपत्ती फक्त 22 बड्या उद्योगपतींकडे आहे, वगैरे देशाचे जे “हाल” चाललेत, त्याबद्दल राहुल गांधींनी फार मोठी “चिंता” व्यक्त केली. पण ही कुठल्या जाहीर सभेत अथवा मुलाखतीत अथवा विचारवंतांच्या चर्चेत केली नाही, तर ती आलिशान कार मध्ये बसून कुत्र्याशी खेळताना “चिंता” व्यक्त केली!! Rahul Gandhi displeased over national situation while playing with his pet dog
राहुल गांधींनी निवडणूक प्रचाराच्या दौऱ्या दरम्यान आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ते आपल्या आलिशान कार मध्ये बसून कुत्र्याशी खेळले. हाय हॅलो केले. कुत्र्याला मांडीवर बसून एक्सरसाइज केले. सगळ्यांना टाटा बाय-बाय केले आणि नंतर ते देशाचे कसे “हाल” चाललेत ते सांगायला लागले.
नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशाचे हालत फारच बिघडली. देशातली बेरोजगारी गेल्या 45 वर्षांमध्ये वाढली नव्हती, तेवढी वाढली. ती 35 % पोहोचली. देशातली संपत्ती जेवढी 70 कोटी लोकांकडे नाही, तेवढी देशातल्या फक्त 22 लोकांकडे आहे. देशातल्या 23 कोटी लोकांना नरेंद्र मोदींनी दारिद्र्यरेषेखाली ढकलले. काँग्रेसने त्याच लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर काढले होते, पण मोदींनी त्यांना पुन्हा दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले. देशातली सगळ्यात मोठी खंडणीखोरी मोदींनी इलेक्ट्रोरल बाँड्सच्या रूपाने आणली, अशा “तक्रारी” राहुल गांधींनी केल्या, पण या सगळ्या “तक्रारी” करताना राहुल गांधी आपल्या आलिशान कार मध्ये बसून कुत्र्याशी खेळताना दिसले. त्यांचा कुत्र्याशी खेळत बसण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
तसेही राहुल गांधी कुत्रा प्रेमी आहेत. कुठल्याही गंभीर राजकीय विषयाशी चर्चा ते कुत्र्याशी खेळतानाच करतात, अशी आठवण एकेकाचे काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सांगितले होती. आसाम मधल्या काँग्रेसचे “राजकीय दुखणे” सांगायला हेमंत विश्वशर्मा राहुल गांधींच्या घरी गेले होते. राहुल गांधींनी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. पण दोन-तीन मिनिटांतच ते आपल्या कुत्र्याशी खेळायला लागले. कुत्र्याला बिस्किट खाऊ घालायला लागले. त्यामुळे “अपमानित: झालेले हेमंत विश्वशर्मा चिडले. त्यांनी नंतर काँग्रेस सोडली. ते भाजपमध्ये आले. आसाम मध्ये काँग्रेस पराभूत झाली. हेमंत विश्वशर्मा यांच्या नेतृत्वाखाली आसाम मध्ये भाजपचे सरकार आहे. राहुल गांधींचे कुत्र्याशी खेळण्याची कर्तृत्व केवढे “मोठ्ठे” आहे, हे आसाममध्ये सिद्ध झाले. त्या पाठोपाठ आता देशाचे किती “वाईट्ट हाल” चालले आहेत, हे राहुल गांधींनी आपल्या आलिशान कार मध्ये कुत्र्याशी खेळताना जनतेसमोर आणले आहे!!
Rahul Gandhi displeased over national situation while playing with his pet dog
महत्वाच्या बातम्या
- विदर्भात 2019 पेक्षा 5% कमी मतदान; देशातील मतदानात 8% घट, गतवेळी झाले होते सरासरी 69% मतदान
- देशातल्या पहिल्या नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाहांबरोबर 5 – 6 बैठका होऊनही पवारांनीच शब्द फिरवला; अजितदादांचाही
- इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय
- मणिपूरमध्ये मतदानाच्या दिवशी हिंसाचार, मतदान केंद्रावर EVM फोडले