विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभरात सुरू असताना त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारी विषयीची चर्चा काँग्रेस नेत्यांनी पुढे सरकवली आहे. याच चर्चेत तृणमूळ काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. 1990 च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी जशी रथयात्रा काढली होती, तशीच भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी काढली आहे. राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान पदाची क्षमता आहे. ते सर्व विरोधकांचे मिळून पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरू शकतात, असे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. Rahul Gandhi could be prime ministerial candidate, said shatrughan sinha, but TMC dismissed his stance
शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सुखावले असले तरी, खुद्द शत्रुघ्न सिन्हा ज्या पक्षातून लोकसभेवर निवडून गेले आहेत, त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सिन्हा यांचे वक्तव्य मान्य आहे का??, हा महत्त्वाचा प्रश्न तयार झाल्याबरोबर तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनाच फटकार लगावली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचे वैयक्तिक विचार आहेत ते त्यांनी मांडले आहेत त्यांच्या विचारांची तृणमूल काँग्रेस सहमत नाही असे तृणमूळ काँग्रेसचे प्रवक्ते खासदार शंतनु सेन यांनी स्पष्ट केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते या मुद्द्यावर देखील शंतनु सेन यांनी पवारांना टोला लगावला आहे सर्व विरोधकांनी आधी आपापल्या राज्यांमध्ये जिंकून दाखवावे आणि मग केंद्रात एकजुटीची भाषा करावी, असे शंतनु सेन म्हणाले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 2021 – 22 मध्ये सर्व विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामधून त्यांनी काँग्रेसला काहीसे बाजूला ठेवले होते. ममता बॅनर्जी यांचा स्वतःचाच सर्व विरोधकांच्या मिळून पंतप्रधान पदाच्या उमेदवार बनण्याच्या इरादा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षाचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांना न विचारता राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरविणे हे ममता बॅनर्जी यांना राजकीय दृष्ट्या अजिबात रुचले नाही. त्यातूनच त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना फटकार लगावली आहे.
Rahul Gandhi could be prime ministerial candidate, said shatrughan sinha, but TMC dismissed his stance
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, पण सरकार पडण्याची राऊतांची तारीख टळली; 14 फेब्रुवारीला पुढची सुनावणी
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण
- जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ गंगेवर चालणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन