वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मोदी आडनावाला चोर ठरविल्याने सुरत कोर्टाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर कायदेशीर तरतुदीच्या आधारे लोकसभेच्या सभापतींनी खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व आज रद्द केली. Rahul Gandhi – Congress MP from Wayanad, Kerala – disqualified as a Member of Lok Sabha following his conviction in the criminal defamation case over his ‘Modi surname’ remark
आपली खासदारकी परत मिळवण्यासाठी आता राहुल गांधींना सुरत कोर्टाच्या शिक्षेला गुजरात हायकोर्टामधून स्थगिती घ्यावी लागेल आणि त्या स्थगितीची प्रत लोकसभेच्या सभापतींना सादर करावी लागेल अन्यथा लोकसभेच्या उर्वरित मुदतीपर्यंत म्हणजे 2024 पर्यंत तोपर्यंत राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहील.
कर्नाटकातील सभेत राहुल गांधींनी 2019 मध्ये सगळेच मोदी चोर कसे?? नीरव मोदी, ललित मोदी देशाला फसवून पळून गेले. नरेंद्र मोदी देशाला ठगवत आहेत, असा आरोप केला होता. हाच आरोप अखेर राहुल गांधींना कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या भोवला आहे. सुरत कोर्टाने सुमारे साडेतीन वर्षांनंतर या केसचा निकाल देऊन राहुल गांधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि कोणत्याही शिक्षा सुनावलेल्या संसद सदस्याला उर्वरित काळासाठी सदस्यपदी राहता येत नाही या कायदेशीर तरतुदीनुसार लोकसभेच्या सभापतींनी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केले आहे.
काँग्रेसचे सकाळपासून आंदोलन
राहुल गांधींच्या खासदारकीवर गाज पडणार याची खात्री झाल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी आधीच लोकसभेबाहेर विजय चौकात निदर्शने आरंभली होतीच. त्यांनी त्या मध्ये बाकीच्या विरोधकांची साथ घेण्याचाही प्रयत्न केला. काही विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली पण तृणमूळ काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आदी पक्षांचे खासदार काँग्रेसच्या त्या आंदोलनापासून दूर राहिले, इतकेच नाही तर समाजवादी पक्षाने देखील काँग्रेस पासून या प्रकरणात अंतरच राखणे पसंत केले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीला समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव उपस्थित होते. परंतु काँग्रेसच्या आंदोलनात बाकीचे समाजवादी पक्षाचे खासदार सामील झाले नव्हते. यातूनच समाजवादी पक्षाने राहुल गांधींची खासदारकी रद्द झालेल्या प्रकरणात काँग्रेस पासून अंतर राखल्याचे दिसून आले.
– राजकीय हौतात्म्य
एकूणच राहुल गांधी आता राजकीय दृष्ट्या हुतात्मा झाले आहेत. भारतीय राजकारणातला राजकीय हौतात्म्याचा अनुभव पाहिला, तर संबंधित पक्षाला त्याचा जरूर फायदा होतो. संबंधित पक्षाच्या दिशेने सहानुभूतीची लाट जाते. पण हा फायदा आता राहुल गांधींच्या राजकीय हौतात्म्याच्या बाबतीत काँग्रेसला होईल का??, काँग्रेसच्या बाजूने अशी लाट गेली तर बाकीच्या प्रादेशिक पक्षांचे काय होईल हे महत्त्वाचे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत.
Rahul Gandhi – Congress MP from Wayanad, Kerala – disqualified as a Member of Lok Sabha following his conviction in the criminal defamation case over his ‘Modi surname’ remark
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट
- ‘’आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर…’’ फडणवीसांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं विधान!
- उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…
- माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा पाठोपाठ नाशिक मध्येही बेकायदा दर्गे, मशिदींविरुद्ध एल्गार; नवशा गणपती शेजारील दर्गा टार्गेटवर!!