• Download App
    नवे राजकीय नटसम्राट : दिल्लीत राहुल गांधींना घर नाही; ठाकरे गटाला मुंबईत विधिमंडळात कार्यालय नाही!! Rahul Gandhi and Uddhav Thackeray; dilemma of Dynasty politcs increased

    नवे राजकीय नटसम्राट : दिल्लीत राहुल गांधींना घर नाही; ठाकरे गटाला मुंबईत विधिमंडळात कार्यालय नाही!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली / मुंबई : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवे राजकीय नटसम्राट उदयाला आल्याचे दिसत आहे. दिल्लीत राहुल गांधींना घर नाही आणि ठाकरे गटाला मुंबईच्या विधिमंडळात पक्ष कार्यालय नाही, अशी या नटसम्राटांची अवस्था झाली आहे. Rahul Gandhi and Uddhav Thackeray; dilemma of Dynasty politcs increased

    वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट नाटकात आप्पासाहेब बेलवलकर यांना खरंच स्वतःचे घर उरले नव्हते. एका महान नटसम्राटाची शोकांतिका या नाटक रूपाने अजरामर झाली.  पण दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या राजकीय नटसम्राटांची कथाच वेगळी आहे.

    राहुल गांधींनी छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात जाहीर करून टाकले, की गेली 52 वर्षे झाली आपल्याला राजधानी दिल्लीत घर नाही. ज्यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि ज्यांचे वडील राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान राहिले, त्यांचे वारसदार खासदार राहुल गांधींना दिल्लीत स्वतःचे घर घेता आले नाही, अशी त्यांची खंत आहे.

    पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावर असताना ज्या तीन मूर्ती भवनात राहिले, ते तीन मूर्ती भवन आता खुद्द त्यांच्याच स्मारक रूपाने मंडित आहे. तीन मूर्ती भवन हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्मारक आहे आणि तेथेच नेहरू मेमोरियल नॅशनल लायब्ररी आहे. त्याच्या मागच्या मोकळ्या भूखंडावर आता देशातल्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक संग्रहालय मोदी सरकारने बांधले आहे.

    इंदिरा गांधींची ज्या बंगल्यात हत्या झाली, त्या 1 सफदरजंग मार्ग या बंगल्यामध्ये इंदिरा गांधींचे राष्ट्रीय स्मारक आहे. तेथे त्यांच्या सर्व वस्तू आणि स्मृती जपून ठेवण्यात आल्या आहेत.

    राजीव गांधी पंतप्रधान असताना 10 जनपथ मध्ये राहायचे. आज त्या निवासस्थानात सोनिया गांधी राहतात. त्या रायबरेलीच्या खासदार आहेत.



     

    राहुल गांधी सध्या वायनाडचे खासदार आहेत. त्यांना सरकारी बंगला दिलेला आहे. 12 तुगलक मार्ग, नवी दिल्ली 110 011 असा राहुल गांधींच्या निवासस्थानाचा पत्ता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे जे विवरण सादर केले आहे, त्यानुसार त्यांची संपत्ती 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. असे राहुल गांधी म्हणतात, आपल्याला दिल्लीत घर नाही!!

    ठाकरे गटाला कार्यालय नाही

    मुंबईतल्या महाराष्ट्र विधिमंडळात ठाकरे गटाला सध्या कार्यालय नाही. विधिमंडळात शिंदे गटाने म्हणजेच अधिकृतरित्या शिवसेनेने कार्यालय ताब्यात घेतले आहे. त्यांचे 40 आमदार आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना अधिकृत पक्षाची मान्यता दिली आहे. त्यामुळे विधिमंडळात शिंदे गट शिवसेना म्हणून बसतो. त्यामुळे ठाकरे गटाने नेमके कुठे बसायचे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

    त्याचबरोबर विधिमंडळातले कार्यालय हा देखील ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे कार्यालय विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला देऊन टाकले आहे. ठाकरे गटाने पत्र दिले तर त्यांच्यासाठी नव्या कार्यालयाची व्यवस्था करता येईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

    परंतु ठाकरे गटाची पंचायत अशी आहे, की त्यांचा तर संपूर्ण शिवसेना पक्षावर दावा आहे आणि ते सुप्रीम कोर्टात त्यासाठीच कायदेशीर लढाई लढत आहेत. आता जर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना आपल्या गटाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र पत्र दिले, तर हे पत्रच ठाकरे गटाने शिवसेनेवरचा दावा अधिकृतरित्या सोडून दिल्याचा पुरावा मानले जाऊ शकते.

    ठाकरे गटाचे हे पत्र शिंदे गट सुप्रीम कोर्टात सादर करू शकतो. त्याचबरोबर अध्यक्ष देखील या पत्रानुसार ठाकरे गटाला स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देऊ शकतात. अशा स्थितीत ठाकरे गट कायदेशीर पेचप्रसंगात अडकू शकतो. त्यामुळे ठाकरे गटाने अद्याप तरी आपल्या स्वतंत्र कार्यालयासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलेले नाही.

    अशा पद्धतीने दिल्लीत राहुल गांधींना घर नाही आणि महाराष्ट्र विधिमंडळात ठाकरे गटाला कार्यालय नाही, अशी दिल्ली आणि मुंबईतल्या नव्या राजकीय नटसम्राटांची अवस्था झाली आहे.

    Rahul Gandhi and Uddhav Thackeray; dilemma of Dynasty politcs increased

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!