• Download App
    Rahul Gandhi and Raj Thackeray

    राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची काँग्रेस + मनसेतून वजाबाकीची दमबाजी; मग कशी होईल सत्ता आणायची स्वप्नपूर्ती??

    नाशिक : राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची काँग्रेस आणि मनसेतून वजाबाकीची दमबाजी; मग कशी होईल सत्ता आणायची स्वप्नपूर्ती??, असा सवाल राहुल गांधी आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणामुळे समोर आला आहे. Rahul Gandhi and Raj Thackeray

    लोकसभेतले विरोधी पक्ष ्नेते राहुल गांधींनी काल अहमदाबादच्या “झेड” हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण केले तिथे त्यांनी काँग्रेस पक्षातून चाळणी लावून भाजपचे काम करणाऱ्या आणि त्यांना आणि कार्यकर्त्यांना हाकलून देण्याची भाषा केली. राहुल गांधींच्या या भाषणाचा काँग्रेसच्या नेत्यांनी खूप उदोउदो केला. पण प्रत्यक्षात ते राहुल गांधींचे वजाबाकीचे भाषण ठरले. कारण त्यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक दोषाचे खापर पक्षाच्या गुजरात मधल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर फोडले. पण काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेतृत्वच गुजरातमध्ये पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठलाही राजकीय कार्यक्रम द्यायला आणि त्यांना पक्षात टिकवून धरायला अपयशी ठरले याबद्दल राहुल गांधींनी चकार शब्द काढला नाही.

    गुजरात मध्ये काँग्रेस आधीच तब्बल २५ वर्षे सत्तेबाहेर असताना असताना जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते पक्षात टिकले, त्यांना टिकवून धरण्याऐवजी आणि त्यांना ठोस राजकीय कार्यक्रम देण्याऐवजी राहुल गांधींनी दमबाजीचे भाषण करण्याचे पसंत केले. गुजरात काँग्रेसने कुठले सामाजिक आणि राजकीय आंदोलन उभे करावे. तिथल्या भाजपच्या सरकारला सळो की पळो सोडावे, असे राहुल गांधी काहीही बोलले नाहीत, ज्याची खरं म्हणजे खरी गरज होती. त्यावर राहुल गांधींनी उरलेल्या काँग्रेसमध्येच चाळणी लावून भाजपचे तथाकथित काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हाकलून देण्याची भाषा केली. आता ही भाषा आल्यानंतर राहुल गांधी गुजरात काँग्रेसमध्ये कोणत्या बेरजेचे राजकारण करणार आणि त्यातून पक्षाची सत्ता आणणार??, हा सवाल पैदा झाला.



    – राज ठाकरेंचे वजाबाकी भाषण

    जे राहुल गांधींनी अहमदाबाद मध्ये केले तेच राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणिसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केले. त्यांनी देखील मनसे मध्ये काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हाकलून देण्याची भाषा केली. मला पक्षात राजकीय फेरीवाले नको तुम्ही काम करणारा असाल तर तुम्हाला पदावर ठेवीन नाहीतर पदावरून हाकलून देईन, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांचे रोखठोक शैलीतले भाषण तिथल्या सभागृहात असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फार आवडले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. पण राज ठाकरे यांचे देखील भाषण वजाबाकीचेच ठरले याचे कुणाला भान राहिले नाही. राज ठाकरेंच्या मनसेमध्ये स्वतः राज ठाकरेंचा करिष्मा या खेरीज दुसरे कुठलेच राजाकीय भांडवल नाही. त्यांच्या पक्षात आधीच नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वानवा आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी मनसेला कुठला मोठा राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाचा कार्यक्रम दिला आणि तो दीर्घ काळ यशस्वी करून दाखवला असे घडलेले नाही मराठी पाट्या आणि टोल नाके यावर आंदोलन करून तात्पुरते मीडिया ग्लेअर मिळते. पण लोकांची मते मिळत नाहीत आजपर्यंतचा अनुभव राज ठाकरे यांच्या गाठीशी असताना त्या अनुभवातून ते काही शिकलेत याचे प्रतिबिंब राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणात पडले नाही.

    त्याउलट कुंभमेळ्याची नक्कल, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दमबाजी यावरच राज ठाकरे यांनी आपले भाषण उरकून घेतले. गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवण्याची भाषा वापरत आज चाकू सुरे काढणार नाही, एवढेच ते म्हणाले. पण मनसेला कुठला ठोस कार्यक्रम राज ठाकरे देखील आज कमी पडले.

    राहुल गांधी काय किंवा राज ठाकरे काय, दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षांमध्ये वजाबाकी करायचेच भाषण केले पण पक्षाला ठोस राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम देऊन तो दीर्घकाळ चालू होईल निवडणुकीत यशस्वी कॉम्बिनेशन करण्यात ते फारच कमी पडले हेच राजकीय वास्तव दोघांच्याही भाषणातून समोर आले.

    Rahul Gandhi and Raj Thackeray doing minus politics from their own parties

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी