• Download App
    टेम्पल रनच्या पलिकडे भारत जोडोचा नवा अर्थ; हिंदुत्वात नव्हे, तर राजकीय हिंदूकरणात काँग्रेसला सापडेल का स्वार्थ? Rahul Gandhi and Congress searching its political future in Hinduism and not Hindutva

    टेम्पल रनच्या पलिकडे भारत जोडोचा नवा अर्थ; हिंदुत्वात नव्हे, तर राजकीय हिंदूकरणात काँग्रेसला सापडेल का स्वार्थ?

    विशेष प्रतिनिधी

    राहुल गांधींनी भारत जोडचा 2000 किलोमीटर चालण्याचा टप्पा पार करून मध्य प्रदेशात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भाषणात जी राजकीय टर्मिनोलॉजी येत चालली आहे, त्याचा बारकाईने “बिटवीन द लाईन्स” अभ्यास केला, तर एक बाब लक्षात येईल ती म्हणजे भाषणांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये भले ते मोदी सरकारवर शरसंधान साधत असतील, पण त्यांच्या भाषेत मात्र बहुसंख्य हिंदू शब्द प्रामुख्याने आलेले दिसतात. जी टर्मिनोलॉजी काँग्रेसचे नेते कटाक्षाने पूर्वी टाळत होते, तीच टर्मिनोलॉजी राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान आवर्जून वापरताना दिसत आहेत. Rahul Gandhi and Congress searching its political future in Hinduism and not Hindutva

    उदाहरणच द्यायचे झाले, तर आपल्या भारत जोडो यात्रेमध्ये आपल्या चालण्याला ते स्वतःची तपस्या म्हणतात. इतकेच नाही तर नफरत आणि हिंसेविरोधात भाषण करताना जास्तीत जास्त सॉफ्ट हिंदुत्वाकडे समाजाचा झुकाव पाहून त्याला अनुकूल शब्द वापरतात. राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वर त्यांचे जे विविध फोटो प्रसिद्ध केले जातात, त्यामध्ये तर ते चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतात की काय असेच दिसून येते. मोदी केदारनाथ मधल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. त्यांचे फोटो त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. राहुल गांधींचा सुद्धा नर्मदा किनाऱ्यावरचा ध्यानस्थ बसल्याचा प्रसिद्ध झाला आहे. इतकेच नाही, तर विशिष्ट भगवे शिरस्त्राण धारण करून ते नर्मदा मैयाची आरती करतानाचेही फोटो प्रसिद्ध केले आहेत.

    राहुल गांधींनी 2019 च्या निवडणुकीच्या सुरुवातीला गावांमध्ये जाऊन तिथल्या मंदिरांमध्ये दर्शने घेतली होती. त्याचे नाव त्यावेळी प्रसार माध्यमांनी “टेम्पल रन” असे दिले होते. पण राहुल गांधींचा हा नवा “तपस्या अवतार” भारत जोडोच्या निमित्ताने जो पुढे आला आहे, तो मात्र “टेम्पल रन”च्या पुढे जाणार आहे आणि ते चक्क राजकीय हिंदूकरणात काँग्रेसचा स्वार्थ शोधू पाहत आहेत.

    अर्थात राहुल गांधींचे राजकीय हिंदूकरण हे राजकारणाचे हिंदूकरण नव्हे, हिंदुत्व तर अजिबात नव्हे. फार तर त्याला सॉफ्ट राजकीय हिंदूकरण म्हणता येईल. कारण त्यांनी स्वतःच हिंदू धर्म आणि हिंदुत्व यातला भेद उत्तराखंडच्या निवडणुकीत त्यांच्या दृष्टीने जाहीर केला होता. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाला फॉलो करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण भारत जोडोच्या निमित्ताने ते काँग्रेसचे राजकीय हिंदूकरण करून आपला राजकीय परफॉर्मन्स वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे टेम्पल रनच्या पुढचे पाऊल असल्याचे देखील स्पष्ट होत आहे.

    आता राहुल गांधींना त्यात यश किती येईल??, काँग्रेसचे हे राजकीय हिंदूकरण मतदारांच्या कितपत पचनी पडेल आणि ते काँग्रेसला किती प्रतिसाद देतील??, याची उत्तरे कदाचित गुजरातच्या आणि त्यानंतर 2023 मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

    Rahul Gandhi and Congress searching its political future in Hinduism and not Hindutva

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार