• Download App
    दूरदृष्टी अन्‌ नेतृत्वाच्या अभावामुळेच कोरोनाची दुसरी लाट, अर्थतज्ज्ञ रघूराम राजन यांची केंद्रावर टीका|Raghuram Rajan lashes on govt.

    दूरदृष्टी अन्‌ नेतृत्वाच्या अभावामुळेच कोरोनाची दुसरी लाट, अर्थतज्ज्ञ रघूराम राजन यांची केंद्रावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतून केंद्र सरकारने कोणताच धडा न घेता ते गाफील राहिले. यातून दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा अभावच दिसून येतो, अशी टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी केली आहे.Raghuram Rajan lashes on govt.

    तुम्ही जर योग्य काळजी घेतली असती, दक्ष राहिला असता तर तुम्हाला हे लक्षात यायला हवे होते की संसर्ग अद्याप संपलेला नाही.’’ असे राजन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.



    जगभरातील अन्य देशांकडे नजर टाकली असती तर इतरत्र काय घडते आहे हे सहज लक्षात आले असते. उदाहरणच द्यायचे झाले तर ब्राझीलचे देता येईल.

    हा विषाणू संपलेला नाही तो परत डोके वर काढू शकतो हे यातून सहज समजले असते, असेही राजन यांनी स्पष्ट केले.पहिल्या लाटेतील आंशिक यशामुळे आपण लोकसंख्येच्या प्रमाणात लशी देखील तयार करू शकलो नाही.

    अनेकांना असे वाटले की कोरोनाला हाताळण्यासाठी आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि आपण संथगतीने लसीकरण करू शकतो. आता संसर्ग वाढल्यानंतर केंद्राने लसीकरणाला वेग दिला असल्याचे त्यांनी सांगितले

    Raghuram Rajan lashes on govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा