वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. रघुराम राजन यांच्यावर हल्लाबोल करताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, त्यांनी आरबीआय गव्हर्नर पदावर असताना संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली होती.Raghuram Rajan, a failed economist, disrupted the banking system, criticizes Union Minister Rajiv Chandrasekhar
रघुराम राजन हे अयशस्वी अर्थतज्ज्ञ
रघुराम राजन यांच्यावर हल्लाबोल करताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, ते अयशस्वी राजकारणी आहेत की अयशस्वी अर्थतज्ज्ञ आहेत हे त्यांनी ठरवावे. ते म्हणाले की, आपल्या सर्वांना माहिती आहे की, ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर असताना त्यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र उद्ध्वस्त केले होते.
रविशंकर प्रसाद म्हणाले होते- प्रायोजित तज्ज्ञ
रघुराम राजन यांच्यावर हल्ला करणारे राजीव चंद्रशेखर हे भाजपचे पहिले नेते नाहीत. यापूर्वी 1 जून 2023 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 साठी 7.2 टक्के जीडीपीचे आकडे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बहाण्याने रघुराम राजन यांच्यावर हल्ला चढवला होता. रघुराम राजन यांचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, प्रायोजित तज्ज्ञांचे सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत.
भारत जोडो यात्रेमुळे निशाण्यावर
रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यापासून आरबीआयचे माजी गव्हर्नर भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत रघुराम राजन यांची मुलाखतही घेतली होती. त्याच मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताने जीडीपीचा आकडा 5 टक्के गाठला तर ते नशीबवान असेल. 2022-23 मध्ये जीडीपी 7.2 टक्के होता तेव्हापासून रघुराम राजन यांच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आणि त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली जात आहे.
Raghuram Rajan, a failed economist, disrupted the banking system, criticizes Union Minister Rajiv Chandrasekhar
महत्वाच्या बातम्या
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम
- मोदींच्या ‘सहकार से समृद्धी’ संकल्पनेला साकार करण्यासाठी विशेष उपक्रम
- पोलीस निरीक्षक बदलीच्या वादातून शिवसेना-भाजपमध्ये कल्याण मध्ये ठिणगी; पण राजीनाम्याच्या तयारीचा डॉ. श्रीकांत शिंदेंचा खुलासा