• Download App
    नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला|Raghunandan Srinivas Kamath, founder of Naturals Ice Cream, passes away at the age of 70

    नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन, वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

    वृत्तसंस्था

    मुंबई : भारतातील शीर्ष आइस्क्रीम ब्रँडपैकी एक नॅचरल्स आइस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. 17 मे रोजी संध्याकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.Raghunandan Srinivas Kamath, founder of Naturals Ice Cream, passes away at the age of 70

    वडील आंबे विकायचे

    कामथ यांचे वडील कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील एका गावात आंबे विकायचे. योग्य फळे कशी निवडायची आणि ती कशी जतन करायची हे शिकण्यासाठी कामथ यांनी वडिलांसोबत अनेक वर्षे काम केले. व्यवसाय करायचा विचार करून कामत मुंबईत आले. कामथ यांनी 14 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांचा पहिला आइस्क्रीम ब्रँड नॅचरल्स लाँच केला. त्यांनी मुंबईतील जुहू येथे पहिले दुकान उघडले.



    त्यावेळी नॅचरल्सकडे केवळ 4 कर्मचारी होते. त्यांच्याकडे 10 फ्लेवर्सचे आइस्क्रीम होते. सुरुवातीला कामत यांनी आईस्क्रीमसोबत पावभाजीही ठेवली. काही काळानंतर, त्यांनी 12 फ्लेवर्ससह एक संपूर्ण आइस्क्रीम पार्लर म्हणून स्टोअर सुरू केले. आज ती 400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची कंपनी आहे. तर नॅचरल्स आईस्क्रीमचे 2020 पर्यंत देशभरात 135 आइस्क्रीम पार्लर होते.

    पहिल्या वर्षी 5 लाख रुपये कमावले

    आता नॅचरल्सचा देशातील टॉप 10 ब्रँडमध्ये समावेश झाला आहे. सुरुवातीच्या वर्षात त्यांना 5 लाखांची उलाढाल झाली. आर्थिक वर्ष 2020 मध्ये, नॅचरल्स आईस्क्रीमची उलाढाल 300 कोटी रुपयांवर पोहोचली. 2022 मध्ये ते 400 कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

    Raghunandan Srinivas Kamath, founder of Naturals Ice Cream, passes away at the age of 70

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!