प्रतिनिधी
गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा भाजपने घेतल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची टीका करणाऱ्या माध्यमांना आणि सोशल मीडियातील ट्रॉलर्सना विजय रुपाणी यांची कन्या राधिका रूपाणी हिने एक परखड फेसबुक पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले आहे. Radhika Rupani’s reply to the critics
नुसत्या दंगली घडवून आणि टीका करून गुजरातचे नूकसान करण्यापेक्षा संघ आणि भाजपच्या तत्त्वानुसार सत्ता सोडणे केव्हाही चांगले, असे प्रत्युत्तर राधिका रुपाणी हिने टीकाकारांना दिले आहे. विजय रुपाणी यांच्या राजकीय कारकीर्दीचा सविस्तर उहापोह राधिका तिने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
गुजरात मध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक संकट आले अथवा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा आपले वडील घटनास्थळी पोहोचणारे पहिले नेते होते. त्यांनी 1979 पासून जनसेवेला सुरुवात केली आहे. विविध पदांवर राहून त्यांनी निष्ठेने काम केले आहे गुजरातच्या जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द एका पदापुरती मर्यादित नाही, असेही तिने टीकाकारांना सुनावले आहे.
मोरवीचा पूर, अक्षरधामवरील दहशतवादी हल्ला, गुजरातची गोधरानंतरची दंगल या संकट काळात आपले वडील जनतेच्या मदतीसाठी आणि गुजरातच्या सेवेसाठी आघाडीवर होते. सध्याच्या काळात सुद्धा सातत्याने कार्यरत होते. मध्यरात्रीपर्यंत त्यांचे काम चालायचे. तरी पहाटे लवकर उठून कुठे काम सुरू करायचे, अशी आठवणही राधिकाने फेसबुकवर जागवली आहे.
Radhika Rupani’s reply to the critics
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल्स : चला आपण आपला दिवस चांगला करण्यासाठी योग्य दिनचर्या आखू या….
- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले,’पाकिस्तानने केवळ हक्कानी नेटवर्क दिले नाही, तर तालिबानी दहशतवाद्यांनाही आश्रय दिला आहे
- ‘शरिया विद्यापीठ’: अफगाण विद्यार्थ्यांनी इस्लामिक कायद्यानुसार अभ्यासावर केले प्रश्न उपस्थित , तालिबानने दिली ‘ही’ ऑफर
- महाराष्ट्र: ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या’ जौनपूर पॅटर्न ‘विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला