• Download App
    नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले म्हणत अमृता फडणवीस यांनी जाहीर केली प्रश्नपत्रिका|Question paper announced by Amrita Fadnavis saying Naughty Namard, Bigde Nawab, Nanhe Patole

    नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले म्हणत अमृता फडणवीस यांनी जाहीर केली प्रश्नपत्रिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृत फडणयवीस यांनी प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.Question paper announced by Amrita Fadnavis saying Naughty Namard, Bigde Nawab, Nanhe Patole

    अमृता फडणवीसांनी ट्विट करत एक प्रश्नपत्रिका शेअर केली आहे. त्याला थोडक्यात उत्तरे द्यावे 50 मार्क्स… असे शिर्षक देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो ५० मार्क्स ! वाईनशराब नही होती ! हरामखोर का मतलब है और सुनने में आया है नामर्द है !



    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सातत्याने भाजपवर निशाणा साधत असतात. नुकतेच त्यांनी किरीट सोमय्यांवर देखील भाष्य केले होते. यावरुनच त्यांना बिगडे नवाब असे संबोधीत केले आहे. राजकारणात नॉटी हा शब्द बराच गाजला होता.

    यावरुन संजय राऊतांवर त्यांनी निशाणा साधला आहे. तर सध्या नाना पटोले पंतप्रधान मोदींविरोधात बरीच वादग्रस्त विधाने करत असताना दिसत आहेत. यावरुन नन्हें पटोले असं म्हणत अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    Question paper announced by Amrita Fadnavis saying Naughty Namard, Bigde Nawab, Nanhe Patole

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली