वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कतारमधील न्यायालयाने 8 माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ते एक वर्षापासून कतारच्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारत सरकारने यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, आम्ही निकालाच्या तपशीलाची वाट पाहत आहोत.Qatar sentences 8 former Indian sailors to death; Indian government is trying to rescue them
कतार सरकारने 8 भारतीयांवरील आरोप सार्वजनिक केलेले नाहीत. कतारमध्ये ज्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची नावे- कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी आहेत.
महिनाभरापासून अटकेची माहिती कुटुंबीय व सरकारला नव्हती
कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने 30 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना अटक केली होती. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली होती.
30 सप्टेंबर रोजी या भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांशी थोड्या वेळासाठी दूरध्वनीवरून बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या अटकेच्या एका महिन्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी प्रथमच कॉन्सुलर ऍक्सेस मंजूर करण्यात आला. यावेळी भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.
यानंतर या लोकांना दर आठवड्याला कुटुंबीयांना फोन करण्याची परवानगी देण्यात आली. डिसेंबरमध्ये दुसरा कॉन्सुलर ऍक्सेस मंजूर झाला.
Qatar sentences 8 former Indian sailors to death; Indian government is trying to rescue them
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार, लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
- ”शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!
- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने अजितदादांवर “बंदी प्रयोग”!!; पण तो सुलटेल की उलटेल??
- आदिकैलासहून परतणारी कार दरीत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू