• Download App
    G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!! Putin did not come to the G20 summit, but did not abandon his friend

    G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आले नाहीत हे खरे पण यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ मात्र सोडलेली नाही, हेही तितकेच खरे. Putin did not come to the G20 summit, but did not abandon his friend

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले आहे. रशियाने भारताकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे, असेही नमूद केले.

    ते आठव्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. पुतिन म्हणाले, याबाबत आपण रशियाच्या सहकारी देशांकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे. या बाबत भारताचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी भारतात उत्पादित केलेल्या कार आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना भारतात तयार झालेल्या ब्रँडच्या वापराला प्रोत्साहन देऊन योग्य गोष्ट करत आहेत. रशियातही ती वाहने उपलब्ध आहेत आणि आपण ती वापरली पाहिजेत, असे आग्रही मत पुतिन यांनी व्यक्त केले.

    नवी दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेला पुतिन आले नव्हते. पण त्यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ सोडलेली नाही हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. भारत – रशिया स्ट्रॅटेजी पार्टनरशिपच्या दृष्टीने पुतिन यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

    पाश्चिमात्यांचा हेतू फोल

    दिल्लीतील G20 समूहाची शिखर परिषद अत्यंत यशस्वी झाली. युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक प्रतिक्रिया रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी रविवारी शिखर परिषदेच्या सांगता समारंभानंतर व्यक्त केली होती. दिल्ली घोषणापत्रात रशियाचा उल्लेख न झाल्याने संतुष्ट झालेल्या लाव्हरोव्ह यांनी G20 मध्ये भारताच्या कामगिरीचे कौतुक केले होते.

    परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह म्हणाले होते, युक्रेन मुद्दय़ावरून पाश्चिमात्य देशांना शिखर परिषद दावणीला बांधता आली नाही. G20 शिखर परिषद युक्रेनमय करण्याचा पाश्चात्य देशांचा हेतू फोल ठरवण्यात आम्ही यशस्वी झालो. G20 समूहावर आता पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व राहू शकणार नाही. जगात नवे सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

    Putin did not come to the G20 summit, but did not abandon his friend

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Baba Sivanand : १२८ वर्षीय योगगुरू बाबा शिवानंद यांचे निधन… वाराणसीमध्ये घेतला अखेरचा श्वास, २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

    मोठी बातमी! अमृतसरमधून दोन ISI हेरांना अटक

    Pakistan पाकिस्तानच्या युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरेल एवढाच दारूगोळ्याचा साठा!!

    Icon News Hub