• Download App
    दक्षिण दिल्लीतील शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याची ईमेलद्वारे धमकी; घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल! Pushp Vihars Amrita School gets bomb threat via email in South Delhi

    दक्षिण दिल्लीतील शाळेत बॉम्बस्फोट घडवण्याची ईमेलद्वारे धमकी; घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल!

    दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आल्याचे समोर आले आहे. सकाळी सातच्या सुमारास शाळा प्रशासनाला हा मेल प्राप्त झाला. या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून शाळा रिकामी करून घेतली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. शाळेत शोधमोहीम सुरू आहे. Pushp Vihars Amrita School gets bomb threat via email in South Delhi

    दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. इंडियन स्कूलला दोन मेल आले आहेत. आतापर्यंत मेल पाठवणाऱ्यांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय, डीपीएस मथुरा रोडवर या शाळेलाही दोन मेल आले होते. मात्र मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थीच निघाले होते. आता हा पाचवा मेल आहे, याचा तपास सुरू आहे.

    Pushp Vihars Amrita School gets bomb threat via email in South Delhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये