वृत्तसंस्था
पुरी : Puri Jagannath Temple पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची बहुप्रतीक्षित मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. ओडिशा सरकारने चैत्र शुक्ल सप्तमीला (25 मार्च, बुधवार) दुपारी 12:12 पासून ते 1:45 पर्यंतचा शुभ मुहूर्त त्यासाठी निश्चित केला आहे. यापूर्वी 1978 मध्ये रत्न भंडारातील आभूषणांची गणती झाली होती. ती तब्बल 72 दिवस चालली होती.Puri Jagannath Temple
या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण तसेच व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेचे नोंदणीकृत सराफही यावेळी उपस्थित राहणार आहेत.Puri Jagannath Temple
मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी दैनिक भास्करशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘यावेळी गणती किती दिवस चालेल, हे आताच संागणे घाईचे ठरेल. कोणकोणत्या दिवशी भंडारातील दागिन्यांची गणती होईल, याचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले जाणार आहे. राज्य सरकार दोन रत्नवैज्ञानिकही उपलब्ध करून देणार आहे. आभूषणांवर लावलेल्या मूल्यवान रत्नांची ते ओळख पटवतील. पाढी यांच्यानुसार, बाहेरील रत्न भंडारात भगवान जगन्नाथाच्या दैनंदिन वापराची आभूषणे ठेवली जातात. ती सर्वात आधी काढून मोजली जातील. त्यानंतर आतील रत्न भंडार उघडले जाईल.
खजिन्यातून रोज चावी आणतील दंडाधिकारी, त्याच दिवशी जमा
दागिन्यांच्या गणतीसाठी राज्य सरकारने मार्गदर्शक प्रणाली जारी केली आहे. तीन सदस्यीय समिती प्रक्रियेची पूर्णपणे निगराणी करेल. सोने, चांदी आणि इतर किमती आभूषणांसाठी वेगवेगळे बॉक्स असतील. 10 जण आभूषणे बॉक्समध्ये सुरक्षित ठेवतील. दंडाधिकारी खजिन्यातून रोज रत्न भंडाराची चावी घेऊन येतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच दिवशी ती जमा केली जाईल. शनिवार-रविवार आणि सण-उत्सवाच्या दिवशी भाविकांच्या गर्दीमुळे मोजदाद केली जाणार नाही. ओडिशा उच्च न्यायालयाने गणती तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र मुदत वाढवण्याची विनंती केली जाऊ शकते.
… तेव्हा 128 किलो सोने आणि 221 किलो चांदी!
‘रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचिन खजिना आहे. हे मंदिर जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला आहे. 1978 मध्ये झालेल्या गणतीनुसार, येथे 128.38 किलोग्राम सोने आणि 221.53 किलोग्राम चांदीची आभूषणे आहेत. त्यात हिरे-दागिने यांच्याही समावेस आहे. 14 जुलै 2024 रोजी 46 वर्षानंतर रत्न भंडार डागडुजीसाठी उघडण्यात आले होते. आता मौल्यवान आभूषणे पुन्हा मूळ भंडारात ठेवण्यात येणार आहेत.
Puri Jagannath Temple Ratna Bhandar Inventory to Begin March 25 VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- ठाण्याच्या आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची धुळवड साजरी; पण साधेपणाने!!
- आखाती युद्धाचा तेलाला फटका पण रशियाकडून तेल खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा!!
- पवारांच्या नेतृत्वाला महाविकास आघाडीतूनच सुरुंग; काँग्रेस आणि ठाकरे यांनी रोखली पवारांची double game!!
- Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममतांनी बंगालला घुसखोरांचे नंदनवन बनवले; आता त्यांना मतदार यादीतून वगळले