वृत्तसंस्था
चंदिगड :Punjab Police पंजाब पोलिसांनी १३ महिन्यांपासून बंद असलेल्या हरियाणा-पंजाबच्या शंभू आणि खानौरी सीमा मोकळ्या केल्या आहेत. येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हाटवण्यात आले. यावेळी २०० शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी बांधलेले शेड बुलडोझरने पाडण्यात आले.Punjab Police
पंजाब पोलिसांच्या कारवाईनंतर, उद्या हरियाणा पोलिसही दोन्ही सीमेवर पोहोचतील, त्यानंतर सिमेंट बॅरिकेड्स हटवले जातील. यानंतर, शंभू बॉर्डरपासून जीटी रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
तत्पूर्वी, बुधवारी शंभू आणि खानौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चेचा ७ वा टप्पा अनिर्णीत राहिला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांच्यासह शेतकरी नेते त्यात सहभागी झाले होते.
यामध्ये पंजाब सरकारने शेतकऱ्यांना सीमा रिकामी करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. यानंतर, आंदोलनाचे नेतृत्व करणारे किसान मजदूर मोर्चा (केएमएम) चे निमंत्रक सर्वन पंधेर आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) चे जगजीत दलेवाल यांना ताब्यात घेण्यात आले.
१३ फेब्रुवारीपासून शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी निदर्शने करत आहेत. त्यानंतर, दिल्लीला जात असताना, हरियाणा पोलिसांनी त्यांना तिथे बॅरिकेडिंग करून रोखले होते. ते एमएसपीची हमी देणारा कायदा करण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी त्यांनी चार वेळा दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शंभू सीमेपलीकडे जाऊ दिले गेले नाही.
Punjab Police vacates Shambhu-Khanauri border after 13 months; Bulldozers remove farmers’ sheds, 200 protesters detained
महत्वाच्या बातम्या
- Trump-Putin : युक्रेन युद्धावर ट्रम्प-पुतिन यांच्यात 90 मिनिटे चर्चा; युद्धबंदीवर 2 महिन्यांत चौथ्यांदा संवाद
- Devendra fadnavis पवार + जयंत पाटलांसारखे प्रगल्भ विरोधक जर केंद्रात असते, तर लोकशाही अधिक बळकट झाली असती; फडणवीसांचा काँग्रेसला टोला!!
- औरंगजेब मुद्द्यावर संघाने कान टोचल्याची माध्यमांमध्ये चर्चा; प्रत्यक्षात प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचार आणि संघशताब्दी मुद्द्यांवर भर!!
- Election Commission : मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याची तयारी; निवडणूक आयोग-गृह मंत्रालयाच्या बैठकीत निर्णय