या अगोदर अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याप्रकरणी पंजाबमध्येही दोघांना अटक करण्यात आली होती.
विशेष प्रतिनिधी
सरहिंद : खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी मोठा धक्का दिला असून, त्याचा मुख्य साथीदार जोगा सिंग याला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आलं आहे. सरहिंद येथून जोगा सिंग यास अटक करण्यात आली आहे. डीआयजी बॉर्डर रेंज नरिंदर भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. Punjab police have arrested Waris Punjab De chief Amritpal Singh main aide Joga Singh
यापूर्वी अमृतपाल सिंगला आश्रय दिल्याप्रकरणी पंजाबमध्येही दोघांना अटक करण्यात आली होती. अधिका-यांनी सांगितले की, अटक केलेल्यांची नावे होशियारपूर जिल्ह्यातील बाबक गावातील रहिवासी राजदीप सिंग आणि जालंधर जिल्ह्यातील रहिवासी सरबजीत सिंग अशी आहेत. राजदीप सिंग आणि सरबजीत सिंग यांना शुक्रवारी रात्री न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांनी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
याशिवाय सोमवारी पोलिसांनी अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी पापलप्रीत सिंग याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक केली होती. त्याला कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही अटक पंजाब पोलिसांच्या स्पेशल सेल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईचा भाग होती. पापलप्रीत सिंगला मंगळवारी सकाळी आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले.
Punjab police have arrested Waris Punjab De chief Amritpal Singh main aide Joga Singh
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!