- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर ६ गडी राखून सहज विजय मिळवला.
- धोनीचा २०० वा सामना.Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2021: Thalaiva Dhoni 200; Deepak Chahar seals victory; Jadeja’s superb fielding; Chennai became King
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि मोईन अलीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या पराभवानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला २० षटकात ८ बाद १०६ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान १५.४ षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीचा हा चेन्नईसाठी २०० वा सामना होता, त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला.
सामन्यात ४ षटकात ४ बळी घेणाऱ्या दीपक चहरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
टीम इंडियाच नाहीतर जगातल्या सर्वोत्तम फिल्डरपैकी एक असलेल्या रविंद्र जडेजाने पुन्हा एकदा मैदानात अफलातून फिल्डिंगचा नजराणा पेश केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातल्या मॅचमध्ये जडेजाने आपली गणना सर्वोत्तम फिल्डर्समध्ये का होते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
जडेजाने केएल राहुलला रन आऊट केलं.
तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुलची विकेट गेल्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये जडेजाने दीपक चहरच्या बॉलिंगवर पॉईंटला क्रिस गेलचा अफलातून कॅच पकडला.
आयपीएल इतिहासात एका टीमकडून २०० मॅच खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असलेला धोनी जेव्हा टॉससाठी मैदानात उतरला तेव्हा धोनीने हा रेकॉर्ड केला.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तीनवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आतापर्यंत त्याने चेन्नईकडून १९९ सामन्यांमध्ये ४०.६३ च्या सरासरीने ४६३२ रन केले, यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधला धोनीचा स्ट्राईक रेट १३६ आहे.
Punjab Kings vs Chennai Super Kings IPL 2021: Thalaiva Dhoni 200; Deepak Chahar seals victory; Jadeja’s superb fielding; Chennai became King