पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. चंदिगडच्या डीएसपींनी सिद्धू यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. Punjab Elections Navjot Singh Sidhu in trouble a day before polls, DSP files defamation suit
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू मतदानाच्या एक दिवस आधी अडचणीत आले आहेत. चंदिगडच्या डीएसपींनी सिद्धू यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदिगडचे डीएसपी दिलशेर सिंह चंदेल यांनी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या कोर्टात सिद्धूंविरोधात फौजदारी मानहानीची याचिका दाखल केली आहे. “2021 मध्ये एका रॅलीत पोलिसांविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल सिद्धू बिनशर्त माफी मागण्यास अयशस्वी ठरले,” असे डीएसपी म्हणाले.
सिद्धू यांची पोलिसांवर कॉमेंट
डिसेंबर 2021 मध्ये पंजाबच्या माजी मंत्री अश्निनी सेखरी यांच्या रॅलीत पोहोचलेल्या सिद्धूने पंजाब पोलिसांची खिल्ली उडवली होती. अश्विनी सेखरी यांनी धक्का मारला तर पोलिस स्टेशनची चड्डी ओली होते, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी त्यांना या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी हे केवळ गमतीनेच सांगितले असल्याचे सांगितले. सिद्धूंनी तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी चंदीगड पोलिसांच्या डीएसपींनी नवज्योत सिंग सिद्धू यांना नोटीस पाठवून मानहानीचा खटला दाखल केला.
Punjab Elections Navjot Singh Sidhu in trouble a day before polls, DSP files defamation suit
महत्त्वाच्या बातम्या
- Prime Minister Narendra Modi ! पुणे मेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर
- औरंगाबादमध्ये जयंतीनिमित्त उभारला शिवरायांचा ५२ फुटी भव्य पुतळा
- हिंदुस्थान हे तुमचेही घर!!; अफगाण हिंदू – शीख समुदायाला पंतप्रधान मोदींचे आश्वासन!!; 7 लोक कल्याण मार्गावर केले स्वागत!!
- बायो-सीएनजी प्लांट ७५ मोठ्या शहरांमध्ये बांधणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
- शिवजयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल!’