Punjab CM Oath : पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओपी सोनी यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये प्रथमच 2 उपमुख्यमंत्री झाले आहेत. शपथविधी सोहळा सकाळी 11 वाजता होणार होता, पण राहुल गांधींच्या प्रतिक्षेत 22 मिनिटे उशीर झाला. यानंतर शपथविधीला सुरुवात झाली. राहुल गांधी राजभवनात पोहोचले. दुसरीकडे, बंडाळीमुळे मुख्यमंतिपदावरून पायउतार झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग शपथविधीला उपस्थित नव्हते. Punjab CM Oath Swearing in Charanjit Singh OP Soni and sukhjinder Randhava takes Oath As Deputy CM
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजित सिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओपी सोनी यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये प्रथमच 2 उपमुख्यमंत्री झाले आहेत. शपथविधी सोहळा सकाळी 11 वाजता होणार होता, पण राहुल गांधींच्या प्रतिक्षेत 22 मिनिटे उशीर झाला. यानंतर शपथविधीला सुरुवात झाली. राहुल गांधी राजभवनात पोहोचले. दुसरीकडे, बंडाळीमुळे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग शपथविधीला उपस्थित नव्हते.
चरणजितसिंग चन्नी पंजाबच्या इतिहासातील पहिले दलित मुख्यमंत्री बनले आहेत. त्याचबरोबर जाटसिख समाजातील सुखजिंदर सिंह रंधावा आणि हिंदू नेता म्हणून ओपी सोनी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. यापूर्वी सोनी यांच्या जागी ब्रह्ममोहिंद्राचे नाव जाहीर करण्यात आले होते. मोहिंद्रा हे कॅप्टन अमरिंदर यांच्या गटातील आहेत, त्यामुळे त्यांचे नाव अखेरच्या क्षणी बाद करण्यात आले. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिद्धू यांच्या पाठिंब्याने चन्नी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवण्यात यशस्वी झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर खुर्ची रिकामी झाली.
नव्या मंत्रिमंडळाची उत्सुकता
चरणजित सिंग चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांची मंत्रिमंडळावर नजर राहील. चन्नी आतापर्यंत तंत्रशिक्षण मंत्री होते. त्यांना आता कोणते मंत्रालय मिळेल? दोन उपमुख्यमंत्र्यांची काय जबाबदारी असेल. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आता मंत्री कोण होणार आणि कॅप्टन सरकारच्या मंत्र्यांमधून कोणाचा पत्ता कट होणार? चन्नी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून काँग्रेसने दलित मतदारांना साधण्याची युक्ती लढवली आहे. दुसरीकडे, आगामी निवडणुका काँग्रेस कोणाच्या नेतृत्वात लढणार यावरून काँग्रेसमध्ये आताच वाद सुरू झाले आहेत. राज्य प्रभारी हरीश रावत यांच्या मते, सिद्धूंच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवाव्यात, तर ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी यावर जाहीर आक्षेप घेतला आहे.
Punjab CM Oath Swearing in Charanjit Singh OP Soni and sukhjinder Randhava takes Oath As Deputy CM
महत्त्वाच्या बातम्या
- सोनू सूदवरील प्राप्तिकर छाप्यांचा तपास राजस्थानच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला, 175 कोटींच्या संशयास्पद व्यवहाराचा खुलासा
- शपथविधीआधी पंजाब काँग्रेसमध्ये नव्या वादाची फोडणी, हरीश रावत म्हणतात- सिद्धूंच्या नेतृत्वात पुढील निवडणुका लढू, सुनील जाखड यांचा उघड विरोध, वाचा सविस्तर…
- पोलिसांनी ताब्यात घेताच रेल्वे स्थानकावरच किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद, म्हणाले- ठाकरेंचा 19 बंगल्यांचा घोटाळा, जरंडेश्वरची पाहणी करणार, रोखून दाखवा!
- मुंबईच्या वर्सोवा बीचवर गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 5 मुले बुडाली; 2 जणांना वाचवण्यात यश; तीन बेपत्ता
- Indian Railway ! सुवर्णसंधी ! रेल्वेने सुरू केली विशेष योजना-50 हजार तरूणांना मिळेल प्रशिक्षण;’या’ 4 ट्रेडमध्ये मिळवू शकतात नोकरी; घ्या सविस्तर माहिती…