- भारतात राजकारण तापले
वृत्तसंस्था
चंदीगड : दारूचा असर, विमानातून उतर!!; पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांना जर्मनीत झटका??… अशा आशयाची बातमी आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री, शिरोमणी अकोले दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी या संदर्भातले ट्विट केले आहे. Punjab Chief Minister Bhagwant Mann was attacked by Lufthansa company in Germany
मुख्यमंत्री भगवंत मान जर्मनीच्या दौऱ्यावर असताना फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले. मान हे दारूच्या नशेत होते. त्यांना साधे चालताही येत नव्हते, असे सहप्रवाशांनी सांगितल्याचे बादल यांनी आपले ट्विटमध्ये म्हटले आहे. या संदर्भात नेमका खुलासा भगवंत मान आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी करावा. कारण या घटनेमुळे पंजाब प्रांताची मान शरमेने खाली गेली आहे, असे सुखबीर सिंग बादल यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
सुखबीर बादल म्हणतात : विमानातील प्रवाशांनी मीडियाला दिलेली माहिती अस्वस्थ करणारी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरच्या फ्लाइटमधून उतरवण्यात आले. कारण ते दारूच्या नशेत होते. त्यामुळे विमानाला 4 तास उशीर झाला. पण पंजाब सरकार या सर्व बातम्यांवर मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. हा पंजाबचा आणि देशाभिमानाचा प्रश्न असल्याने भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. जर भगवंत मान विनाकारण विमानातून उतरवण्यात आले असेल तर भारत सरकारने त्याबाबत जर्मन सरकारशी बोलले पाहिजे.
भगवंत मान यांचा जर्मनी दौरा
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना 17 सप्टेंबर 2022 रोजी जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्थांसा एअरलाइन्सच्या विमानातून उतरवण्यात आले. ते दारूच्या नशेत होते, त्यामुळे विमान कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते.
Lufthansa वेबसाइटनुसार, विमान फ्रँकफर्टहून शनिवारी दुपारी 1.40 वाजता निघणार होते. ते दिल्लीत रात्री 12.55 वाजता उतरले असते, परंतु या गदारोळानंतर विमानाने 4 तास उशिराने उड्डाण केले आणि सोमवारी पहाटे 4.30 वाजता दिल्लीत उतरले.
सहप्रवाशांनी सांगितले की भगवंत मान यांना नीट चालताही येत नव्हते. या बाबत आम आदमी पार्टीचे मीडिया कम्युनिकेशन संचालक चंदर सुता डोगरा यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते 17 तारखेऐवजी 18 तारखेच्या फ्लाइटने परततील, असे सांगितले.
मात्र, विमानातील उर्वरित प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, भगवंत मान यांनी इतकी दारू प्यायली होती की त्यांना नीट चालताही येत नव्हते. त्यांची पत्नी आणि सुरक्षा कर्मचारी त्यांना आधार देत होते. त्यामुळे सुरक्षेचे कारण देत मान यांना खाली उतरवण्यात आले. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना न उतरवण्याचा प्रयत्न केला, पण फ्लाइट स्टाफला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे अखेर त्यांना विमानातून उतरविण्या आले.
पण या संपूर्ण घटनेमुळे विमानाला 4.00 तास उशीर झाला. यावरून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. मात्र, आम आदमी पार्टीने हे संपूर्ण प्रकरण फेटाळले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे मीडिया प्रभारी नवनीत वाधवा म्हणाले की, या सर्व फालतू गोष्टी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जर्मनी दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार ते 18 सप्टेंबरपर्यंत जर्मनीत राहणार होते. त्या नियोजनानुसार ते दौरा करून परत आले, असा दावा त्यांनी केला.
Punjab Chief Minister Bhagwant Mann was attacked by Lufthansa company in Germany
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हरियाणा काँग्रेसमध्ये घमासान : हुड्डा आणि सुरजेवाला गट आमनेसामने
- मनी लाँडरिंग प्रकरण: जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स, आज पुन्हा होणार चौकशी
- पाकिस्तान अन्न संकट : सव्वाशे रुपये किलो झाले पीठ, सर्वसामान्यांचे हाल, महागाईने मोडले कंबरडे
- Queen Elizabeth II Funeral: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार, ही विशेष तयारी