वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अर्थात पूर्वेकडील शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची आहे. अशा या पुण्याचा डंका शिक्षण क्षेत्रात पुन्हा गाजला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले ना ?Pune’s fame in the field of global education Savitribai Phule Pune University, IISER topped the list of two thousand universities
या कोरोनाच्या काळात तुम्ही म्हणाल काय राव चेष्टा करता की काय ,? पण हे खरे आहे. पुण्यातील दोन संस्था जगभरातील दोन हजार विद्यापीठांच्या यादीत झळकल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि भारतीय विज्ञान शिक्षा एंव अनुसंधान संस्था, पुणे (IISER) , अशी त्यांची नावे आहेत. या दोन संस्था जगातील 2 हजार विद्यापीठाच्या यादीत अव्वल ठरल्या आहेत.
या संदर्भातील माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली.सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी 2020 -2021 च्या रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1329 व्या क्रमांकावर तर भारतीय विज्ञान शिक्षा एंव अनुसंधान संस्था, पुणे 1073 व्या स्थानावर राहिले आहे.
Pune’s fame in the field of global education Savitribai Phule Pune University, IISER topped the list of two thousand universities
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, टिकरी बॉर्डरच्या आंदोलनातील 25 वर्षीय महिलेचे निधन
- Covid-19 vaccines : कोरोना लस पेटंटमुक्त करण्यास अमेरिका तयार, भारताच्या प्रस्तावानंतर केले समर्थन
- Chaudhary Ajit Singh Death : माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह चौधरी यांचे कोरोनाने निधन; वडील पंतप्रधान, तर स्वत ७ वेळा होते खासदार
- Corona Crisis in India : चिंताजनक! देशात 24 तासांत 4.12 लाख रुग्णांची नोंद, 3980 मृत्यू; महामारीतील सर्वोच्च आकडेवारी
- जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, १ शरण