आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात प्रथम क्रमांकावर तर दिल्ली एनसीआर अगदी तळाला असल्याचे अमेरिकन कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. बेडची संख्या, हवा आणि पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्था आदी निकष यासाठी लावण्यात आले आहे.Pune ranks first in health infrastructure, while Delhi-NCR is at the bottom, according to a survey by an American company.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे देशात प्रथम क्रमांकावर तर दिल्ली एनसीआर अगदी तळाला असल्याचे अमेरिकन कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. बेडची संख्या, हवा आणि पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्था आदी निकष यासाठी लावण्यात आले आहे.
अमेरिकास्थि न्यूज कॉर्प आणि ऑट्रेलियन रिअल इस्टेट एजन्सीने हा अहवाल हाऊसींग डॉट कॉम या साईटवर जारी केला आहे. यामध्ये पुण्यासह अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली एनसीआर, हैद्राबाद, कोलकत्ता आणि मुंबई या शहरांत पाहणी करण्यात आली. हाऊसींग डॉट कॉमने त्यासाठी सिटी हेल्थ कार्ड तयार केले आहे.
एखाद्या शहरात दर हजार नागरिकांमागे किती बेड उपलब्ध आहेत, हवा आणि पाण्याची गुणवत्ता कशी आहे, सांडपाणी व्यवस्था कशी आहे यावर शहरांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात आले आहे. यामध्ये चाळीस टक्के गुण हे हॉस्पीटलमधील बेडच्या संख्येला दिले होते.
हाऊसींग डॉट कॉमने म्हटले आहे की आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विचार केला तर पुणे शहरात सर्वाधिक आहे. पुण्यात दर हजार लोकसंख्येमागे ३.५ हॉस्पीटल बेड उपलब्ध आहे. भारत देशाच्या सरासरीचा विचार केला तर ही मोठी संख्या आहे.
भारताचा विचार केला देशात दर हजार लोकसंख्येमागे सरासरी अर्धा बेड आहे. सार्वजनिक आणि खासगी अशी दोन्ही रुग्णालये मिळून हा आकडा १.४ पर्यंत जातो. भारतामध्ये दर हजार लोकसंख्येमागे डॉक्टरांची संख्याही अत्यंत कमी म्हणजे ०.८६ इतकी आहे.
आरोग्य सुविधांत टॉपवर असलेल्या पुण्यात इझ ऑफ लिव्हींग, पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा शाश्वत विकासासाठीचा प्रयत्नही चांगला आहे.
या पाहणीत अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी दर हजार लोकसंख्येमागे ३.२ बेड आहे. बंगळुरूमध्ये बेडची उपलब्धता चांगली असली तरी लिव्हींग इंडेक्स, महापालिकेची कामगिरी, हवा आणि पाण्याची गुणवत्ता या निकषांवर शहराची कामगिरी खालावलेली आहे.
दिल्ली-एनसीआर म्हणजे राजधानी दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मिळून बनलेल्या भागात यादीतील इतर शहरांच्या तुलनेत अत्यंत वाईट आरोग्य सुविधा आहे. याचे कारण म्हणजे हवा आणि पाण्याची गुणवत्ता वाईट आहे. सांडपाण्याची व्यवस्था नाही. महापालिकांची कामगिरीही चांगली नाही.
Pune ranks first in health infrastructure, while Delhi-NCR is at the bottom, according to a survey by an American company.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राच्या SWAMIH मुळे मिळाला संकटातील रिअल इस्टेटला आधार, मुंबईतील रिवळी पार्कच्या गृहप्रकल्पाचे उद्या लाभार्थींना हस्तांतरण
- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची ८ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी बैठक; लस केव्हा, किती मिळणार याची सविस्तर दिली माहिती
- आत्मनिर्भर भारत : आता भारतातच बनणार इलेक्ट्रिक कारची बॅटरी, मोदी मंत्रिमंडळाची 18100 कोटींच्या PLIला मंजुरी
- मोठा निर्णय : DRDOच्या ऑक्सिकेयर सिस्टिम खरेदीला पीएम केअर्स फंडची मंजुरी, दीड लाख युनिटची करणार खरेदी
- मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत